मतदार नाव दुरुस्तीचे काम ठप्पच वेबसाईट बंद; टक्केवारीवर परिणाम

मतदार नाव दुरुस्तीचे काम ठप्पच वेबसाईट बंद; टक्केवारीवर परिणाम

लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेत पुन्हा एकदा मतदार यादीतील गोंधळाचे स्वरूप समोर आले आहे. विशेष म्हणजे मतदारांनी भरून द्यावयाचा नमुना नंबर आठ तसेच ओळखपत्राच्या दुरुस्ती यासाठीची वेबसाईट बंद ठेवल्याने अनेक नोंदी तसेच दुरुस्तीची कामे रखडल्याचे निदर्शनास आले आहे.

मतदार यादीतून नावे गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे, त्याचबरोबर अनेक ठिकाणी चुकीची मतदार यादी तसेच मतदारसंघांमध्ये यादीची फोड करताना बदललेले मतदान केंद्र दुरुस्तीसाठी मतदारांनी भरून दिलेल्या अर्जावर कार्यवाही न झाल्याने चुकीची नावे येण्याचे प्रमाण यावेळी वाढले आहे.

नागरिकांनी मतदार यादीमधील नावांमध्ये तसेच अन्य बाबींची असणारी दुरुस्ती करण्याकरिता नमुना नंबर आठ भरून दिला आहे. परंतु ही वेबसाईट बंद असल्याने या अर्जावर कार्यवाही झालेली नाही. परिणामी एकट्या इंदापूर तालुक्यामध्ये तब्बल आठ हजार मतदारांच्या दुरुस्त्या रखडल्याची माहिती समोर आली आहे. या मतदारांना लोकसभा निवडणुकीत मतदान करता आले नाही, अशा तक्रारी आहेत. अनेकांनी ऑनलाइन अर्ज भरून दिले असतानादेखील त्यांना मतदान ओळखपत्रदेखील मिळू शकलेले नाही. लोकसभा निवडणुकीचे कामकाज आणि प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेमध्ये कर्मचारी गुंतून पडल्याने या कामाकडे दुर्लक्ष झाले, त्याचा फटका मतदानाचा टक्का घट होण्यामध्ये झाला आहे. मतदार याद्या आणि नावांमधील दुरुस्तीसंदर्भात आलेले अर्ज त्यावर करावयाची कार्यवाही तसेच बंद असलेली वेबसाईट कधी सुरू होणार, याबद्दल अद्यापही जिल्हा निवडणूक शाखेने स्पष्टता दिलेली नाही.

इंदापुरात अडीच हजार अर्ज पडून
इंदापूर तालुक्यामध्ये सुमारे अडीच हजार मतदारांनी फॉर्म नंबर ८ ऑनलाइन भरून दिला आहे. ओळखपत्राच्या दुरुस्ती तसेच नावांमध्ये आणि वयांमध्ये असणारी दुरुस्ती याबद्दलचे हे अर्ज आहेत. ही दुरुस्ती वेळेत झाली असती, तर या मतदारांना प्रत्यक्ष मतदान करतादेखील आले असते. मात्र, निवडणूक प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा फटका या मतदारांना बसला.

चौकशीची मागणी
लोकसंघर्ष पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मार्च २०२४ पर्यंत अनेकांची नावे मतदार यादीत होती. त्यांना मतदान कार्डही दिले होते, परंतु मतदानप्रसंगी या मतदारांची नावे गायब झाली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;