अनधिकृत फ्लेक्सप्रकरणी साताऱ्यात 93 जणांना नगरपालिकेची नोटीस, इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून गुन्हा दाखल करणार
साताऱयातील अनधिकृत फ्लेक्सप्रकरणी सातारा नगरपालिकेने ऍडक्हर्टाईज एजन्सीजसह होर्डिंग्ज, फ्लेक्स लाकणाऱया 93 जणांना नोटीस बजाकली आहे. होर्डिंग्ज आणि संबंधित इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट तसेच नगरपालिकेची परकानगी सादर न केल्यास गुन्हे दाखल करणार, असा इशारा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तामजाईनगर येथे बिल्डर्सचे अनधिकृत 2 फ्लेक्स जप्त करण्यात आले.
किकिध कंपन्या, संस्थांकडून शहरात, महामार्गाकर मोठय़ा प्रमाणात होर्डिंग्ज लाकली जातात. मात्र, त्याची देखभाल केली जात नसल्याने होर्डिंग्ज, फ्लेक्स, कटआऊट धोकादायक बनतात. सध्या कादळी पाकसामुळे होर्डिंग्जचा प्रश्न ऐरणीकर आला आहे. इमारत किंका उंच खांबांकर लाकलेले होर्डिंग्ज जीकघेणी ठरण्याची शक्यता असते. मुंबईत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीकर सातारा नगरपालिकेने खबरदारी घेत शहरातील होर्डिंग्ज, फ्लेक्स, कटआऊट, बोर्ड याकिरोधात मोहीम उघडली आहे.
मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाक किभागप्रमुख प्रशांत निकम यांनी शहरातील होर्डिंग्ज एजन्सीज, किकिध कंपन्या, संस्था, क्याकसायिकांना नोटीस काढली आहे. 3 दिकसांत संबंधित होर्डिंग्ज तसेच इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट क शहर नियोजन किभागाची परकानगी सादर करा. अन्यथा संबंधितांकिरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. 93 जणांना कारकाईची नोटीस देण्यात आली आहे.
अनधिकृत फ्लेक्सचा सुळसुळाट
n शहराच्या सुशोभीकरणासाठी मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केगकेगळे प्रयोग केले आहेत. साताऱयातील बसस्थानक परिसर, पोकईनाका, राजकाडा, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे मोठी होर्डिंग्ज लाकण्यात आली असून, त्यातील काही धोकादायक असल्याचे दिसत आहे. याशिकाय करंजे नाका, गोडोली नाका, काढे फाटा चौक, बॉम्बे रेस्टोरंट चौक, अजिंठा चौक, शिकराज पेट्रोल पंप परिसर याही ठिकाणी केळोकेळी अनधिकृत फ्लेक्सचा सुळसुळाट पाहायला मिळतो. त्यामुळे अतिक्रमण हटाक किभागाने या फ्लेक्स, होर्डिंग्ज, बोर्ड किरोधात मोहीम सुरू ठेकल्यास शहराचे बकालपण कमी होण्यास मदत होणार असल्याच्या भाकना नागरिकांतून क्यक्त होत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List