नगर एमआयडीसीतील शासकीय गोडाऊनला ट्रिपल सुरक्षा तैनात

नगर एमआयडीसीतील शासकीय गोडाऊनला ट्रिपल सुरक्षा तैनात

लोकसभा निवडणुकीसाठी नगर व शिर्डीसाठी सोमवारी (13 रोजी) मतदान झाले व त्यानंतर प्रशासनाने सर्व ईव्हीएम मशीन एमआयडीसीतील शासकीय गोडाऊनमध्ये ठेवली आहेत. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँगरूमला तीन टप्प्यांत सुरक्षाव्यवस्था देण्यात आली. स्ट्राँगरूममध्ये केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांची तुकडी तैनात आहे. ‘एसआरपीएफ’ची तुकडी व स्थानिक पोलिसांचा पहारा तैनात आहे.

नगरमधील अनेक मतदार केंद्रांवर सायंकाळी सहानंतर मतदान सुरू होते. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरापर्यंत ईव्हीएम मशीन एमआयडीसी येथील गोडाऊन येथे आणण्यात येत होती. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. स्ट्राँगरूमच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय राजपत्रित अधिकाऱयांची टीम आठ तासांच्या शिफ्टमध्ये स्ट्राँगरूमला भेट देणार आहे. गोडाऊनभोवती 4 जूनपर्यंत कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. स्थानिक पोलिसांसोबतच एसआरपीएफ आणि केंद्रीय सुरक्षा बलाचे सुरक्षा जवान स्ट्राँगरूम परिसरात तैनात आहेत.

80 सीसीटीव्ही कॅमेऱयांची नजर

n शासकीय गोडाऊन येथे नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघांच्या तीन स्ट्राँगरूम तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक स्ट्राँगरूममध्ये आठ सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. यासोबतच दोन मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. तीन स्ट्राँगरूम व दोन मतमोजणी केंद्रे अशा पाच ठिकाणी एकूण 80 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

अशी आहे सुरक्षा…

n पोलीस निरीक्षक-2, एपीआय, पीएसआय-7, पोलीस अंमलदार-59, एसआरपीएफ तुकडी-1, सीआरपीएफ तुकडी-1.

तीन स्ट्राँगरूममध्ये विभागणी

n शिर्डी लोकसभा मतदारसंघातील एक हजार 708 मतदान केंद्रे व नगर लोकसभा मतदारसंघातील दोन हजार 26 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन एमआयडीसी येथे ठेवण्यात आली. त्यासाठी तीन स्ट्राँगरूम उभारण्यात आल्या आहेत.

वेबकास्टिंगची सोय

n नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघांच्या ईव्हीएम मशीन तीन स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्राँगरूमची सुरक्षा यंत्रणा पाहण्यासाठी वेबकास्टिंगची सोय करण्यात आली आहे. त्या माध्यमातून स्ट्राँगरूमच्या बाहेर लावण्यात आलेल्या क्रीनवर उमेदवारांच्या प्रतिनिधींना सुरक्षाव्यवस्थेची खातरजमा करता येणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;