न्यायालयाचे तपास यंत्रणांवर ताशेरे

न्यायालयाचे तपास यंत्रणांवर ताशेरे

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा कट डॉ. तावडे याने रचल्याच्या संशयास वाव असला, तरी ते पुराव्यानिशी सिद्ध करण्यामध्ये सीबीआय आणि सरकारी पक्षाला अपयश आले असल्याचे निरीक्षण नोंदवीत न्यायालयाने तपास यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत. तसेच घटनास्थळाची रेकी केल्याचा आरोप असलेला विक्रम भावे आणि गुह्यातील शस्त्र्ा नष्ट करण्याचा सल्ला दिल्याचा आरोप असलेले अॅड. संजीव पुनाळेकर यांच्यावर संशय असला, तरी सबळ पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

दरम्यान, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना ठार मारल्याचे सिद्ध झाले असून, खून केल्याप्रकरणी त्यांना फाशी पिंवा जन्मठेप होऊ शकते, असे सांगत न्यायाधीशांनी आरोपी व त्यांच्या वकिलांना याबाबत विचारणा केली. त्यावर हा दुर्मिळातील दुर्मीळ गुन्हा नसल्याने त्यामध्ये फाशी देता येणार नाही, अशी विनंती बचाव पक्षातर्फे करण्यात आली. याची दखल घेत अंदुरे आणि कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

तपास अधिकाऱयांचा निष्काळजीपणा

आरोपींवर संशय घेण्यास वाव असताना तपास अधिकाऱयांनी योग्य तपास केला नाही. तसेच तपासात निष्काळजीपणा दाखविल्यामुळे तिघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) दाखल केलेला गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

हत्येच्या घटनेचे समर्थन चुकीचे

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणाची सुनावणी सुरू असताना बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपींच्या बाजूने युक्तिवाद करताना डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या घटनेचे समर्थन करणारी वक्तव्ये केली होती. अशी वक्तव्ये खेदजनक असून, वकिलांनी त्याचा विचार करावा, तसेच भविष्यात अशी चूक करू नये, असे न्यायाधीशांनी बचाव पक्षाच्या वकिलांना सुनावले. दरम्यान, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 340नुसार खोटे पुरावे सादर केल्याप्रकरणी तपास अधिकाऱयांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करताना अॅड. संजीव पुनाळेकर यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;