खलिस्तान समर्थक अमृतपाल निवडणुकीच्या रिंगणात?
पंजाबच्या 13 लोकसभा जागांसाठी सातव्या टप्प्यात म्हणजेच 1 जूनला मतदान होणार आहे. त्यादृष्टीने पंजाबमध्ये प्रचार ऐन रंगात असताना आता वारिस पंजाब देचा प्रमुख अमृतपाल सिंह याने खडूर साहिब लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या परवानगीसाठी पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात धाव घेतली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपल्याला सात दिवसांसाठी सोडण्यात यावे, अशी मागणी त्याने केली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची 14 मे ही शेवटची तारीख असून अमृतपालने याचिकेत पंजाब सरकार, निवडणूक आयोग, दिब्रूगढ मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक आणि पंजाब राज्य निवडणुक आयोगाला खडूर साहिब लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी व्यवस्था करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी अमृतपालने केली आहे. वकील इमान सिंह खारा यांच्या माध्यमातून त्याने पंजाब आणि हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. अमृतपाल सिंहचे वडील तरसेम सिंह यांनी 2 मे रोजीच पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांना याप्रकरणी पत्र लिहिले होते. अमृतपालला लोकसभा निवडणुकीसाठी उमेवारी अर्ज भरण्याची परवानगी देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List