मराठा समाजाच्या एकीमुळे मोदींना वारंवार महाराष्ट्रात यावे लागते
मराठा ताकदीने एकत्र आला आहे. त्याची देशाने धास्ती घेतली आहे. या भीतीमुळे चांगल्या चांगल्यांना गुडघे टेकावे लागत आहेत. मराठा एक झाला म्हणूनच राज्यात अनेक टप्प्यांत निवडणूक लागली. दुसरीकडे एक आणि दोन टप्प्यांत निवडणूक होत आहे. मराठा समाजाच्या एकीमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात लोकसभेच्या प्रचारसभांसाठी वारंवार येणे भाग पडत आहे, असे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे.
– दुसऱयासाठी मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका. ही शेवटची संधी आहे तुम्हाला. जात महत्त्वाची आहे. तो आपल्यासोबत आला नाही तर त्याला जिल्हा परिषद, सरपंचपदाला पाडा. मराठय़ांच्या विरोधात जाऊ नका, परिणाम भोगावे लागतील. मराठा कुणबी कायदा पारित केला नाही तर विधानसभेला बघतो, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List