‘मोठ्याचं पोरगं’ एवढीच भाजपा उमेदवाराची गुणवत्ता, बाळासाहेब थोरात यांची टीका

‘मोठ्याचं पोरगं’ एवढीच भाजपा उमेदवाराची गुणवत्ता, बाळासाहेब थोरात यांची टीका

महायुतीच्या उमेदवाराने पाच वर्षांच्या खासदारकीच्या कार्यकाळात काय काम केले? किती फिरले? किती वेळा मतदारसंघात आले? कोणते प्रश्न सोडविले? त्यांनी काहीच काम केले नाही. ‘मोठय़ाचं पोरगं आहे, पैसा भरपूर आहे, सत्तेची ताकद आहे, म्हणून खासदार व्हायचंय,’ यापेक्षा कोणतीही गुणवत्ता त्यांच्याकडे नाही, ही वस्तुस्थिती आहे, अशी टीका काँग्रेस नेते-आमदार बाळासाहेब थोरात यांनी डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता केली.

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ तिसगाव येथे आयोजित सभेत थोरात बोलत होते. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे, नसीर शेख, मुन्ना तांबोळी, शिवशंकर राजळे, रफीक शेख, इलियास शेख, संजय मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘तुमच्या पुढे दोन उमेदवार आहेत. एकाकडे खूप धनसंपत्ती आहे, सत्ता आहे; तर दुसरा आहे तो सर्वसामान्य कुटुंबातला कर्तृत्ववान उमेदवार आहे. साध्या कुटुंबातून आलेल्या उमेदवाराला मतदान केले पाहिजे, असा माझा तुम्हाला आग्रह राहील. गरिबाच्या पोराला संधी मिळणे सोपे नसते. मात्र, नीलेश लंके यांनी ती मिळविली आहे,’ असे थोरात म्हणाले.

हेलिकॉप्टरवाले झाडाखाली जेवत नसतात!

– नगर-पाथर्डी रस्ता झाल्यानंतर ते कामाच्या ठिकाणी गेले. झाडाखाली जेवायला बसले. मात्र, झाडाखाली आम्हीच बसू जाणे! हेलिकॉप्टरवाले कधी झाडाखाली जेवत नाहीत. कुणी कुणाचे काम करू शकत नाही. नीलेश लंके रोडवरही बसू शकतो, वाहतुकीची कोंडी दूर करू शकतो. ते तुम्हाला जमणार नाही. त्यांना फक्त फुकटचे श्रेय घेण्याची सवय लागली असल्याचा टोला नीलेश लंके यांनी सुजय विखे यांना लगावला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;