भन्साळींना वेबसीरिज निर्मितीचा मोह, बाजीराव मस्तानीनंतर आता ‘हीरामंडी’, इतिहास काय?

भन्साळींना वेबसीरिज निर्मितीचा मोह, बाजीराव मस्तानीनंतर आता ‘हीरामंडी’, इतिहास काय?

Heeramandi Series : हिरामंडी द डायमंड बाजारचा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. या टीझरला प्रक्षेकांचा मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची ही नवीन वेबसीरिज सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. देवदास, बाजीराव मस्तानीनंतर संजय लीला भन्साळींचा हीरामंडी सोशल मीडियावर धुमाकूळ घालणार असं म्हटलं जात आहे .

काय आहे पाकिस्तानचा रेडलाइट हिरामंडी?

पाकिस्तानातील सर्वात मोठा रेड लाइट परिसर म्हटलं की हिरामंडी हे नाव समोर येतं. पाकिस्तानमधील हा परिसर जे लाहोरच्या ऐतिहासिक मशिदीपासून फक्त 700 मीटर अंतरावर आहे. त्याच बरोबर लाहोरच्या टाकसाळी येथील गेटजवळ हिरे बाजार आहे. यालाच वेश्या बाजार असं देखील म्हटलं जातं. एका अहवालानुसार जगातील अनेक देशांमध्ये वेश्याव्यवसायासाठी स्वतंत्र जागा देण्यात येते. ती जागा कायदेशीर असून भारतात पैशासाठी सेक्स करणे कायदेशीर आहे. मात्र पाकिस्तानात वेश्याव्यवसायाला परवानगी नाही. त्यामुळे हिरामंडीला इंग्रजीत डायमंड मार्केट असं देखील म्हणतात. हिरामंडी हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा आणि जुना रेड लाईट एरिया आहे. या ठिकाणी रात्री एक वाजेपर्यंत लोक दिसतात.

हिरामंडी हे नाव नेमकं का पडलं?

हिरामंडी हे नाव शिख महाराजा रणजित सिंह यांचे मंत्री हिरा सिंह डोंगरा यांच्या नावावरून ठेवलं असं म्हटलं जातं. काही दिवसांपूर्वी हिरा सिंह यांनीच त्याठिकाणी बाजारपेठ वसवली होती. त्यामुळे त्या ठिकाणाला हिरामंडी या नावाने ओळण्यास सुरुवात झाली. त्याच प्रमाणे बॉलिवूडमध्ये सर्वात प्रथम करण जोहरच्या कलंक या चित्रपटात हिरामंडीच्या नावाचा उल्लेख आला होता. त्यानंतर आता संजय लीला भन्साळी हे या हिरामंडीवर वेबसीरिज निर्मिती करणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;