सलमान खान याला पाहून आनंदी झालेली ऐश्वर्या राय, एकटक पाहातच राहिली, व्हिडीओ व्हायरल

सलमान खान याला पाहून आनंदी झालेली ऐश्वर्या राय, एकटक पाहातच राहिली, व्हिडीओ व्हायरल

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचे मार्ग अनेक वर्षांपूर्वीच वेगळे झाले आहेत. तरी देखील दोघांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आजही दोघांच्या जोडीला चाहते विसरु शकलेले नाहीत. चाहत्यांमध्ये कायम दोघांच्या नात्याची चर्चा रंगलेली असते. आता देखील ऐश्वर्या – सलमान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत.

व्हिडीओमध्ये सलमान खान रॉयल अंदाजात रॅम्प वॉक करताना दिसत आहे. त्याठिकाणी ऐश्वर्या देखील उपस्थित आहे. सलमान याला पाहताच ऐश्वर्या आनंदी होते आणि भाईजानसाठी टाळ्या वाजवताना दिसत आहे. त्यानंतर शेजारी बसलेल्या व्यक्तींसोबत बोलताना अभिनेत्री दिसत आहे. पण सलमानवरून अभिनेत्रीची नजर हटत नाही. दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@salman.khan.heart)

 

व्हिडीओमध्ये ऐश्वर्या हिच्या बाजूला अभिनेता शाहरुख खान बसलेला दिसत आहे. ऐश्वर्या – सलमान यांचा जुना व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘दोघांमध्ये खरं प्रेम होतं. म्हणून लग्न होऊ शकलं नाही, प्रेम दुसऱ्यांदा होत नाही…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सलमान खान कायम हँडसम दिसतो..’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ऐश्वर्या हिच्या डोळ्यांमध्ये प्रेम दिसत आहे…’

सांगायचं झालं तर, सलमान – ऐश्वर्या यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एवढंच नाहीतर, ब्रेकअपनंतर देखील अनेकदा सलमान, ऐश्वर्या हिच्याबद्दल बोलताना दिसला. सलमान खान याच्यापासून विभक्त झाल्यानंतर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. ऐश्वर्या – अभिषेक यांना एक मुलगी देखील आहे.

ऐश्वर्या हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर देखील सलमान खान याच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली. अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासोबत देखील सलमान रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला. पण दोघांचं नातं देखील लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. आज वयाच्या 58 व्या वर्षी देखील सलमान खान एकटाच आयुष्य जगत आहे.

सलमान खान 58 वर्षांचा आहे. पण चाहत्यांच्या मनात आणि बॉलिवूडमध्ये असलेलं अभिनेत्याचं स्थान दुसरा कोणताच अभिनेता घेऊ शकलेला नाही. आज देखील सलमान खान याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते असतात. सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून सलमान खान वादग्रस्त परिस्थितीमुळे चर्चेत आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;