जानकर म्हणाले… अजित पवार भामटा माणूस
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत रासपचे महादेव जानकर यांनी अजित पवार भामटा माणूस असल्याचे म्हटले आहे. मात्र, जानकर यांना वेळीच त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी भामटाऐवजी भाबडा असा शब्दप्रयोग केला. त्यांचा यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
बारामती मतदारसंघात प्रचारसभेत बोलताना जानकर सर्वांचेच कौतुक करत होते. उमेदवारीसाठी पंतप्रधान मोदींचे आभार मानल्यानंतर ते अजित पवारांवर बोलू लागले आणि अजित पवारांना भामटा बोलून गेले. अजित पवार हा तर खूप मनमोकळा माणूस आहे. अजित पवार हा भामटा माणूस आहे, असे जानकर म्हणाले. त्यांनी ही चूक लागलीच सुधारली असली तरी अजित पवार भामटा या वाक्याची जोरदार चर्चा सर्वत्र आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List