तळेगाव व निमोन गटातून भाऊसाहेब वाकचौरे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

तळेगाव व निमोन गटातून भाऊसाहेब वाकचौरे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकसभेची ही निवडणूक राज्यघटना व लोकशाही वाचवण्यासाठी असून भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रत्येक गावाशी संपर्क ठेवला त्यांच्यामुळे संगमनेर तालुक्याला खासदार निधी माहीत झाला असल्याचे प्रतिपादन इंद्रजीत भाऊ थोरात यांनी केले असून भाऊसाहेब वाकचौरे यांना तळेगाव व निमोन गटातून भेटीगाठींना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

तळेगाव गटातील लोहारे, कासारे, वरझडी, तळेगाव, चिंचोली, देवकवठे,पारेगाव, सोनोशी, मालदाड, निमोन,काकडवाडी या विविध गावांमधून वाकचौरे यांनी प्रचारार्थ भेटी दिल्या यावेळी समवेत इंद्रजीत भाऊ थोरात जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, अमर कातारी, संजय फड, कार्याध्यक्ष इंजि.सुभाष सांगळे ,सचिन दिघे, बाबासाहेब कांदळकर, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे, मेजर महेंद्र सोनवणे, भारत शेठ मुंगसे, अनिल कांदळकर, राजेंद्र कहांडळ, राजेंद्र मुंगसे, ज्ञानेश्वर मुंगसे, बी आर चकोर, अनिल घुगे ॲड.ज्ञानेश्वर सांगळे, सखाराम शरमाळे ,बाबासाहेब कडनर, साहेबराव गडाख आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

गावागावातून वाकचौरे यांचे जोरदार स्वागत होत असून या भेटीदरम्यान इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रत्येक गावात मोठा जनसंपर्क ठेवला आहे. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने खासदार निधी काय असतो ते संगमनेर तालुक्याला आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाला कळाले आहे. याउलट विद्यमान खासदार मात्र गायब आहेत. ते कुणालाही दिसले नाही. निवडणुकी आली की फक्त येतात त्यामुळे अशा गायब होणाऱ्या व्यक्तींवर विश्वास न ठेवता आपल्या संपर्कात राहणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा असे आवाहन त्यांनी केले.

तर भाऊसाहेब वाकचौरे म्हणाली की, मी या मातीतला असून मला प्रत्येक तालुक्याची भौगोलिक परिस्थिती माहिती आहे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यभर काम करणार असून संगमनेर तालुक्याच्या व शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कायम कटिबद्ध राहणार आहे. यावेळी महेंद्र गोडगे म्हणाले की, देशात हुकूमशाही रूपात आहे म्हणून लोकशाही पुन्हा आणण्याकरता प्रत्येकाने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे रहा राज्यात आणि देशात भाजप विरोधी मोठी लाट निर्माण झाली असून महाविकास आघाडीच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ही आपल्या हक्काचा माणूस संसदेत पाठवा असे आवाहन त्यांनी केले. सुभाष सांगळे म्हणाले की, दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आमिष भाजपने दाखवले होते. मात्र अनेक उद्योग गुजरात मध्ये पळून बेरोजगारी वाढवली आहे . राज्यातील तरुणाई मध्ये भाजप सरकारविरुद्ध मोठा रोष असून पुन्हा एकदा हाताला काम देण्याकरता महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे. यावेळी गावागावातून विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;