सुनेत्रा पवार यांच्या पराभवासाठी शिंदे गँग काम करतेय; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

सुनेत्रा पवार यांच्या पराभवासाठी शिंदे गँग काम करतेय; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

महायुतीने बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. मात्र, त्यांचा पराभव व्हावा, यासाठी एकनाथ शिंदे यांची गँग काम करत आहे. त्यामुळे महायुतीतील गँगवॉरचा लवकरच स्फोट होईल, असा गौप्यस्पह्ट शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, बारामतीची लढाई ही आमच्यासाठी अस्मितेची असून, महाराष्ट्रातील 48 जागा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत.  महायुतीला शरद पवार यांचा पराभव शक्य नसून, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. सुप्रिया सुळे यांच्यासाठी सर्व भावंडे  त्यांचा प्रचार करीत असून, त्या प्रचंड बहुमताने जिंकून येणार आहेत. अजित पवार यांनी बारामतीत तळ ठोकला काय पिंवा स्वतŠला बांधून घेतले तरी काहीही होणार नाही. कारण त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत होणार आहेत. दुसरीकडे राज्यात महायुतीकडून अनेक ठिकाणी अजूनही उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहाता महाविकास आघाडी 30 ते 35 जागा जिंकणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे अनेक मतदारसंघांत व्यापाऱयांना धमक्या देत आहेत. त्यांना आपल्या बाजूने येण्यासाठी नोटीस पाठवून रडीचे राजकारण करीत आहेत. मात्र, जनता त्यांच्या धमक्यांना आणि दबावाला झुकणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

…तर पवारांना राजदूतवरून दूधच विकत बसावे लागले असते

एकीकडे अजित पवार यांनी सांगितले, मी विजयासाठी मैदानात उतरत असतो. मग 2019 मध्ये पार्थ पवार कसे पडले, असा सवाल संजय राऊत यांनी केला. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी पक्षांतर केले आणि शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत आहेत. आता त्यांच्या पत्नीच्या पराभवाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी शिंदेंची यंत्रणाही कामाला लागल्याचे संजय राऊत म्हणाले. शरद पवार यांनी जर तुम्हाला सामर्थ्य दिले नसते, तर तुम्हाला बारामतीत राजदूत गाडीवर दूधच विकायला लागले असते, असा टोला खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांना लगावला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;