विरोधात हरकत घेऊ नये म्हणून विखे समर्थकांकडून 50 लाख रुपयांची ऑफर; अपक्ष उमेदवार गिरीश जाधव यांचा आरोप

विरोधात हरकत घेऊ नये म्हणून विखे समर्थकांकडून 50 लाख रुपयांची ऑफर; अपक्ष उमेदवार गिरीश जाधव यांचा आरोप

नगर दक्षिण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्याविरोधात हरकत घेऊ नये म्हणून विखे समर्थकांनी 50 लाख रुपयांची ऑफर दिली होती, असा खळबळजनक आरोप अपक्ष उमेदवार गिरीश जाधव यांनी केला आहे. ‘आम्ही अनिलभैया राठोड यांचे मावळे असून, 50 लाखांच्या ऑफरला आम्ही भीक घालणार नाही. जिल्हाधिकाऱयांनी विखे यांच्या अर्जावर घेतलेल्या हरकती फेटाळल्या असल्या, तरी त्याविरोधात उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाद मागणार आहोत,’ असे जाधव यांनी सांगितले.

डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार गिरीश जाधव यांनी शुक्रवारी दोन हरकती नोंदविल्याl होत्या. या हरकतींवर खल होऊन नऊ तासांनंतर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी सुजय विखे-पाटील यांचा अर्ज वैध ठरविला. त्यानंतर गिरीश जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

गिरीश जाधव म्हणाले, ‘सुजय विखे यांनी शासनाची वन विभागाची 500 एकर जमीन 1 रुपया देऊन आपल्या संस्थेसाठी घेतली. त्यांच्याकडे शासनाची 800 ते 850 एकर जमीन असून, या जमिनीवर खासगी कॉलेज उभारून लोकांकडून करोडो रुपयांच्या देणग्या घेत आहेत. त्यावर मी हरकत घेतली होती. भाजपचे महापौर असताना महापालिकेची तीन कोटी रुपयांची पाणीपट्टी सर्वसाधारण सभेत माफ करून घेण्यात आली. सूचक, अनुमोदक, तसेच महापौर हे भाजपचे होते. या सर्वांनी मिळून महापालिकेची लूट केली आहे. त्यासंदर्भात मी जिल्हाधिकाऱयांकडे दाद मागण्यासाठी गेलो होतो, असे जाधव म्हणाले. मी घेतलेल्या दोन्ही हरकती जिल्हाधिकाऱयांनी फेटाळून लावल्या. त्या कोणत्या मुद्दय़ावर फेटाळल्या, याचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही.’

सहकारी संस्थांचा संबंध नसतो, असे जिल्हाधिकारी सांगतात. सहकारी संस्थांचे तुम्ही थकबाकीदार असला, तरीही अर्ज बाद होतो. विखे यांनी सरकारी जागेवर दीडशे कोटींचे कर्ज घेतले आहे. महापालिकेची तीन कोटी रुपयांची माफी घेतली, यावर कोणी बोलायचेच नाही का? असा सवाल जाधव यांनी केला.

जे बरोबर फिरतात तेही विखेंना मतदान करणार नाहीत

n राधाकृष्ण विखे-पाटील पालकमंत्री आहेत, म्हणून जिल्हाधिकाऱयांनी आमच्याविरोधात निकाल दिला. हा निकाल सर्वकालीन नाही. आम्ही उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात जाऊन या निकालास आव्हान देणार आहोत. आम्ही अनिल राठोड यांचे कार्यकर्ते आहोत. पालकमंत्र्यांसोबत आज जे लोक फिरत आहेत, तेदेखील विखे यांच्याविरोधात मतदान करणार असल्याचा दावा जाधव यांनी केला.

विखे यांना माफ करणार नाही

n डॉ. सुजय विखे यांनी मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनिल राठोड यांच्याशी गद्दारी केली. पायाला लागलेले असतानाही अनिल राठोड यांनी सुजय विखे यांचा प्रचार केला होता. रक्तातील साखर वारंवार वाढत असताना, पायाला लागलेले असताना रुग्णालयात उपचार घेऊन रोज 20-22 तास प्रचार केला. त्याची विखे यांना लाज नाही आणि आज ते म्हणतात की, शिवसेनेचे लोक विरोधात आहेत. विरोधात काय सांगता, तुमच्यामुळेच अनिल राठोड गेले. त्यामुळे विखे यांना आम्ही कधीही माफ करणार नाही, असे गिरीश जाधव म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;