गोविंदा-कृष्णा अभिषेकमध्ये अखेर मिटलं भांडण; 8 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

गोविंदा-कृष्णा अभिषेकमध्ये अखेर मिटलं भांडण; 8 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

अभिनेता गोविंदाची भाची आणि टीव्ही अभिनेत्री आरती सिंह नुकतीच लग्नबंधनात अडकली. या लग्नसोहळ्या सर्वांना एकाच पाहुण्याच्या उपस्थितीची प्रतीक्षा होती, ती म्हणजे अभिनेता गोविंदा. भाचा कृष्णा अभिषेकसोबतच्या वादामुळे गोविंदा आरतीच्या लग्नापूर्वीच्या कोणत्याच कार्यक्रमांना उपस्थित नव्हता. त्यामुळे लग्नाला तरी उपस्थित राहून भाचीला आशीर्वाद देणार का, याकडे अनेकांचं लक्ष लागून होतं. अखेर गोविंदाने मुलगा यशसोबत लग्नाला उपस्थित राहून सर्वांची मनं जिंकली. आरतीच्या लग्नाला येऊन गोविंदाने तिला आशीर्वाद दिला. याच लग्नात गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यातील आठ वर्षांपूर्वीचा वाद मिटल्याचं समजतंय. कारण गोविंदाची सून म्हणजेच कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह हिने लग्नात त्याच्या पाया पडून हा वाद मिटवला आहे.

गोविंदा-कृष्णादरम्यान भांडण कशामुळे?

कृष्णा आणि गोविंदा यांच्यातील वाद हा कश्मीरा शाहच्या एका ट्विटमुळे सुरू झाला होता. 2016 मध्ये कृष्णा एक शो करत होता, ज्यामध्ये गोविंदाला आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्याने भाच्याच्या शोमध्ये जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर कृष्णाची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीराने एक ट्विट केलं होतं. ‘काही लोक पैशांसाठी डान्स करतात’, असं तिने ट्विटद्वारे टोमणा मारला होता.

गोविंदाची पत्नी सुनिताला असं वाटलं की कश्मीराने हे ट्विट त्यांच्या कुटुंबीयांसाठी केलंय. यानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये तणाव निर्माण झाला. कश्मीरा आणि सुनीता यांच्यात त्यानंतर बरीच बाचाबाची झाली. यादरम्यान जेव्हा कृष्णाचा मुलगा रुग्णालयात दाखल झाला, तेव्हासुद्धा गोविंदा त्याला बघण्यासाठी रुग्णालयात गेला नव्हता. दोन्ही कुटुंबातील हा वाद हळूहळू इतका वाढत गेला की सुनीताने असंही म्हटलं होतं की, तिला कृष्णा अभिषेकचा चेहरासुद्धा पहायचा नाही.

कृष्णाने मागितली माफी

मामा-भाचामध्ये वाद जरी झाला तरी काही वर्षांनी कृष्णाला ही गोष्ट जाणवली की आपल्या जवळची नाती ही कायम आपल्यासोबत असली पाहिजेत. म्हणूनच गेल्या वर्षी दिलेल्या एका मुलाखतीत त्याने मामाची माफी मागितली होती. “मी त्यांची माफी मागतो आणि माझ्या चुकीसाठी मी त्यांच्या पायासुद्धा पडायला तयार आहे. रक्ताची नाती अशीच संपुष्टात येत नाहीत”, असं तो म्हणाला होता.

आरतीच्या लग्नात सुधारती नाती

मामा-भाचाच्या वादाला आठ वर्षे झाली आहेत. आता आरती सिंहच्या लग्नात हा वाद मिटला, असं म्हणायला हरकत नाही. “त्यांनी आमचा राग आरतीवर काढू नये. लग्नाला उपस्थित राहून तिला आशीर्वाद द्यावा. ते आल्यास मी त्यांच्या पाया पडून स्वागत करेन,” असं कश्मीराने म्हटलं होतं. त्यानुसार कश्मीरा गोविंदाच्या पाया पडली. याविषयी बोलताना ती म्हणाली, “ही काही सांगायची गोष्ट नाही. ते नेहमीच खूप गोड वागायचे. त्यांनी माझ्या दोन्ही मुलांना आशीर्वाद दिला.” मामा गोविंदाला लग्नात पाहून कृष्णा अभिषेकसुद्धा भावूक झाला होता. “मामा आल्याने मला खूप आनंद झाला आहे. ही आमच्या मनातली गोष्ट आहे. आमचं भावनिक कनेक्शन आहे”, अशा शब्दांत कॉमेडियन कृष्णा अभिषेकने आनंद व्यक्त केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मिलिंद देवरा यांच्या गळ्यात मनसेचं उपरणं; म्हणाले, मी नुकतंच… मिलिंद देवरा यांच्या गळ्यात मनसेचं उपरणं; म्हणाले, मी नुकतंच…
दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजित करण्यात आला होता. या...
आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी जे पी नड्डा यांना पोलिसांचे समन्स 
‘क्या कूल हैं हम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन, रितेश देशमुख याने..
दांदावर दादा नाराज, अजित पवारांसमोर असं काय म्हणाले चंद्रकांत पाटील
समाधान पाटील याचा राजकीय खूनच! खेकड्याची चाकरी करणार्‍या पोलिसांच्या भूमिकेवर संशय
ग्रामपंचायतप्रमाणे निवडणूक लढवा ! नीलेश लंके यांचे कार्यकर्त्याना आवाहन
आंबेगाव तालुक्यातील डिंभे कालव्यावरचा पूल कोसळला