बहिणीचे प्री वेडिंग फंक्शन सोडून गोविंदाची लेक पोहचली ‘या’ ठिकाणी, आरती सिंहवर मामा अजूनही नाराज?

बहिणीचे प्री वेडिंग फंक्शन सोडून गोविंदाची लेक पोहचली ‘या’ ठिकाणी, आरती सिंहवर मामा अजूनही नाराज?

टीव्ही अभिनेत्री आरती सिंह हिचे लग्न 25 एप्रिलला आहे. नुकताच आरती सिंहचे संगीत आणि मेहंदी पार पडली. या कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. आरती सिंह ही बाॅलिवूड अभिनेता गोविंदा याची भाची आहे तर काॅमेडियन कृष्णाची बहीण आहे. आरती सिंह ही दीपक चौहान याच्यासोबत लग्न करत आहे. गेल्या काही दिवसांपासून कृष्णा आणि गोविंदा यांच्यामध्ये वाद सुरू आहे. यामुळे आरतीच्या प्री वेडिंग फंक्शनसाठी गोविंदाच्या कुटुंबामधून कोणीही पोहचले नाहीये.

दुसरीकडे कृष्णाची पत्नी कश्मीरा हिने म्हटले आहे की, मामा गोविंदा आणि आमचा वाद आहे. त्यामध्ये आरतीचे काहीच नाहीये. आरतीवर नाराज न राहता, त्यांनी लग्नाला यावे. प्रत्येक कुटुंबामध्ये वाद असतो. त्यांनी आरतीच्या लग्नाला येऊन तिला आर्शिवाद द्यावेत. आरतीची खूप इच्छा आहे की, त्यांनी लग्नाला यावे.

हे सर्व सुरू असतानाच गोविंदा याची मुलगी टीना आहूजा ही आरतीच्या प्री वेडिंग फंक्शनला न जाता मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात पोहचली आहे. याची स्टोरी टीना आहूजा हिने सोशल मीडियावर शेअर देखील केलीये. बहीण आरतीच्या प्री वेडिंग फंक्शनला न जाता टीना मंदिरात गेल्याने लोकांना फार ते पचले नाहीये. यांच्यातील वाद मिटला नसल्याचे दिसतंय.

हेच नाही तर गोविंदा आणि त्याच्या पत्नीने एका मुलाखतीमध्ये थेट मान्य केले होते की, त्याचे आणि कृष्णाचे वाद सुरू आहेत. थेट मुलाखतीमध्येही कृष्णावर टीका करताना गोविंदा दिसला होता. मात्र, वाद नेमके कोणत्या कारणामुळे झाले, हे सांगणे टाळताना गोविंदा दिसला होता. गोविंदाने कृष्णा आणि आरतीचा लहानपणीचा सर्व खर्च उचलल्याचे देखील सांगितले जाते.

आता आरतीच्या लग्नाला तरी सर्व विसरून गोविंदा हा आपल्या कुटुंबासोबत येईल, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. एक मुलाखत कृष्णा आणि आरती यांनी दिली होती. या मुलाखतीमध्ये लहानपणी मामा आपल्याला किती रूपये द्यायचे हे सांगताना कृष्णा दिसला होता. त्यावरूनच हा वाद सुरू असल्याचे देखील सांगितले जाते. गेल्या काही वर्षांपासून कृष्णा आणि गोविंदा हे अजिबातच ऐकमेकांना बोलत नाहीत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;