मजबूत सिमेंट-काँक्रीट रस्त्यांसाठी अभियंत्यांना ‘आयआयटी’चे धडे! 300 जणांसाठी आज प्रशिक्षण

मजबूत सिमेंट-काँक्रीट रस्त्यांसाठी अभियंत्यांना ‘आयआयटी’चे धडे! 300 जणांसाठी आज प्रशिक्षण

मुंबईकरांना दर्जेदार रस्ते मिळावेत यासाठी पालिका अभियंत्यांना ‘आयआयटी’ मुंबईकडून अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकवले जाणार आहे. यासाठी पालिकेच्या 300 अभियंत्यांना  सिमेंट-काँक्रीट रस्ते बनवताना कोणती काळजी घ्यावी, आणि कोणते तंत्रज्ञान वापरावे यासाठी तज्ञ प्राध्यापकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

रस्त्याची कामे दर्जेदार होण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. यामध्ये आता रस्ते बांधकामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, रस्ते बांधणी करताना काय करावे, प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱया अनुभवी अभियंत्यांच्या शंकांचे निरसन व्हावे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. आयआयटी मुंबई पवई येथे 27 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ही  कार्यशाळा होणार आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेचा शुभारंभ होणार आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे (आयआयटी) स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील नामांकित तज्ञ प्रा. डॉ. के. व्ही. कृष्ण राव हे महानगरपालिका अभियंत्यांना प्रमुख मार्गदर्शन करतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानाच महाराष्ट्रात पुन्हा आणखी एका निवडणुकीची घोषणा मोठी बातमी! लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानाच महाराष्ट्रात पुन्हा आणखी एका निवडणुकीची घोषणा
लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आता महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचं...
पॅलेस्टाईन-इस्त्रायल वादावर सोशल मीडियावर पोस्ट, मुख्याध्यापिकेस गमवावी लागली नोकरी
शॉरमा खाताना सावधान, मुंबईत १९ वर्षीय मुलाचा मृत्यू, विक्रेत्याविरुद्ध कारवाई
नजर लागू नये म्हणून आलिया भट्टने केला हा उपाय, रेड कार्पेटवर देसी लूक
ऐश्वर्या राय – कतरिना कैफ कोण आहे सर्वात बेस्ट, सलमान खान याने दिलेलं उत्तर चर्चेत
‘द महाराष्ट्र फाइल्स’मध्ये हिंदी गाण्यावर थिरकरणार गौतमी पाटील
अमिताभ बच्चन- दीपिका यांची पोलखोल, अखेर ‘त्या’ फोटोतून सत्य उघड…