शॉरमा खाताना सावधान, मुंबईत १९ वर्षीय मुलाचा मृत्यू, विक्रेत्याविरुद्ध कारवाई

शॉरमा खाताना सावधान, मुंबईत १९ वर्षीय मुलाचा मृत्यू, विक्रेत्याविरुद्ध कारवाई

चटपटीत आणि स्वादिष्ट खाण्याची सवय अनेक खवय्यांना असते. मग खवय्यांकडून खाऊ गल्ली किंवा प्रसिद्ध दुकांनाचा शोध सुरु होतो. अनेकवेळा स्वस्तात मिळणारे बेकायदेशीर खाद्यपदार्थ खाल्ले जातात. परंतु काही खाताना चांगल्या ठिकाणी खाणे गरजेचे आहे. अन्यथा ते खाणे जीवावर बेतू शकते. मुंबईत असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. शॉरमामधून विषबाधा झाल्यामुळे एका १९ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईतील मानखुर्द भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रथमेश भोकसे असे त्या मुलाचे नाव आहे.

शॉरमा विक्रेत्याविरोधात गुन्हा

सध्या रस्त्यात ठिकठिकाणी शॉरमाच्या गाड्या दिसतात. मानखुर्दमधील महाराष्ट्र नगरमध्ये राहाणाऱ्या प्रथमेश भोकसे याने त्या भागातील एका स्टॉलवर शॉरमा खाल्ला. त्यानंतर त्याला त्रास होऊ लागला. त्या ठिकाणी शॉरमा खाणाऱ्या इतर दहा ते बारा जणांना त्रास सुरु झाला. या लोकांना उलट्या, जुलाब आणि मळमळीचा त्रास होऊ लागला. प्रथमेशला शुक्रवारी तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचार सुरु असताना त्याचा मंगळवारी मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू होताच शॉरमा विक्रेत्याविरोधात मानखुर्द पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.

चिकन खराब असल्याचा संशय

शॉरमातील चिकन खराब असल्याचा पोलिसांना संशय आहे. हा खराब शॉरमा खाल्ल्याने प्रथमेश भोकसे याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. ट्रोम्बे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. दोघांना अटक केली आहे. त्या लोकांनी शॉरमासाठी लागणारे मांस कुठून आणले होते, त्याची चौकशी पोलीस करत आहेत.

बेकायदेशीर खाद्यपदार्थ विक्री

मुंबईतच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी फेरीवाल्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडून अन्नपदार्थांची रस्त्याच्या बाजूला खुलेआम विक्री होते. परंतु त्यांच्याकडे संबंधित महानगरपालिका किंवा नगरपालिका लक्ष देत नाही. अन्न आणि औषध प्रशासन विभागातील कर्मचारी त्याकडे पाहत सुद्ध नाही. यामुळे विषबाधासारखा प्रकार घडत असतो. या प्रकाराची दखल घेऊन बेकायदेशीर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;