द्वेषाचं विष पेरायला जातात आणि स्वत:च त्यात अडकून पडतात, जितेंद्र आव्हाड यांचा मोदींना टोला

द्वेषाचं विष पेरायला जातात आणि स्वत:च त्यात अडकून पडतात, जितेंद्र आव्हाड यांचा मोदींना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधीवर टीका करताना त्यांच्यावर अदानी व अंबानीकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला. मात्र मोदींचे हे आरोप आता त्यांच्यावरच भारी पडताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी या टीकेवर पलटवार करताना ”मोदीजी अदानी अंबानी पैसे देतात हे तुम्हाला कसं माहित”, अशी गुगली टाकली. मोदींच्या आरोपावरु राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्यांच्यावर टीका करत टोले लगावले आहेत.

 

”मोदीजींचा टेलिप्रॉम्पटर या निवडणुकीत चांगलाच गंडलेला दिसतोय. राहुल गांधीच्या जाळ्यात ते अडकताना दिसतायत. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात द्वेषाचं विष पेरायला जातात आणि स्वत:च त्यात अडकून पडतात. मोदीजींनी अदानी-अंबानींचं पहिल्यांदा जाहीरपणे नाव घेऊन आपल्या सच्च्या मित्रांना खोटं आणि भ्रष्टाचारी ठरवण्याचा प्रयत्न केलाय. देशाने याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;