आंबेगाव तालुक्यात खडकीत बिबट्या जेरबंद; उपचारासाठी माणीकडोहला पाठवले

आंबेगाव तालुक्यात खडकीत बिबट्या जेरबंद; उपचारासाठी माणीकडोहला पाठवले

आंबेगाव तालुका आणि बिबट्या हे जणू एक समीकरणच बनले आहे. मागील काही वर्षांपासून या परिसरात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आता बिबटे नागरी वस्तीतही घुसत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावारण आहे. खडकी येथील शेतकऱ्याच्या उसाच्या बाऱ्यामध्ये पाण्यात बसलेल्या बिबट्याला अखेर वनविभागाने गुंगीच्या औषधाचा मारा करत जेरबंद केले आहे. तो बिबट्या आजारी असल्याने त्याला उपचारासाठी माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात पाठवण्यात आले आहे.

आंबेगाव तालुक्यातील खडकी येथील माऊली नगर या परिसरातील नवनाथ शिवाजी वाबळे यांच्या घराजवळ सकाळी पहाटे बिबट्या आढळून आला. तालुक्यात सर्वत्र बिबटे नेहमीच फिरतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, पुन्हा 9 वाजण्याच्या सुमारास तो बिबट्या वाबळे यांच्या घराजवळ फिरताना आढळला. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास वाबळे यांच्या घराशेजारी असणाऱ्या त्यांच्या उसाच्या शेतात पाण्याच्या बाऱ्यामध्ये हा बिबट्या पुन्हा आढळला. तसेच घराबाहेर असलेल्या जाळीच्या कुंपणाला धडक मारू लागला. त्यामुळे त्यांनी तात्काळ वनपाल शशिकांत मडके यांच्याशी संपर्क साधत या घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्र यांच्याशी संपर्क साधून सहाय्यता मागितली. माणिकडोह येथील प्रशिक्षित पथक येताच वनपाल शशिकांत मडके, वनरक्षक संपत तांदळे, वनरक्षक प्रदीप आवटी, ऋषिकेश कोकणे, रेस्क्यू सदस्य डॉ.अतुल साबळे, वनमजूर जालिंदर थोरात यांनी बिबट्याची पाहणी करून बिबट्याला गुंगीचे औषध मारण्याची परवानगी वरिष्ठांकडे मागितली. त्यांच्याशी चर्चा करून बिबट्याला गुंगीचा डॉट मारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे पथकाने बिबट्याला गुंगीचा डॉट मारला. बिबट्या हा आजारी असल्याने तो पाण्यात पडून राहिला होता. त्याला उष्माघाताचा त्रास झाला असावा किंवा तो आजारी असल्याने त्याला उलट्या होत होत्या. गुंगीचे औषध मारत या बिबट्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. हा बिबट्या दीड ते दोन वर्षाचा नर जातीचा असल्याचे सांगण्यात आले. त्याला उपचारासाठी माणिकडोह येथे पाठवण्यात आल्याचे स्मिता राजहंस यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;