Lok Sabha Election 2024 : सातारा मतदारसंघात 10 अपक्षांसह 16 उमेदवार निवडणूक रिंगणात

Lok Sabha Election 2024 : सातारा मतदारसंघात 10 अपक्षांसह 16 उमेदवार निवडणूक रिंगणात

सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून पाच उमेदवारांनी माघार घेतली असून, आता महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे व महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासह एकूण 16 उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तब्बल दहा अपक्षांचा समावेश आहे.

सातारा मतदारसंघात बंडखोरीसारखा कटकटीचा विषय उद्भवला नसल्यामुळे अर्ज माघारीचा विषय सातारासाठी कुतूहलाचा नव्हता. फक्त आहेत त्यामधील कोण-कोण माघार घेणार, इतकीच उत्सुकता होती. आज अर्ज मागे घेणाऱयांमध्ये चंद्रकांत जाणू कांबळे, दिलीप हरिभाऊ बर्गे, दादासा वसंतराव ओव्हाळ, सागर शरद भिसे, विठ्ठल सखाराम कदम यांचा समावेश आहे.

आता सातारा मतदारसंघातून प्रत्यक्ष निवडणूक लढवणाऱया उमेदवारांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे, महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासह एकूण 16 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये तब्बल दहा अपक्षांचा समावेश आहे. या उमेदवारांना लागलीच निवडणूक चिन्हेही दिली गेली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार व त्यांचे पक्ष याप्रमाणे ः बहुजन समाज पक्ष – आनंद रमेश थोरवडे (बुधवार पेठ, कराड), वंचित बहुजन आघाडी – प्रशांत रघुनाथ कदम (वडगाव, उंब्रज, ता. कराड), बहुजन मुक्ती पार्टी – तुषार विजय मोतलिंग (कळंभे, ता. वाई), बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी – सयाजी गणपत वाघमारे (तळबीड, ता. कराड).

अपक्ष उमेदवार ः बिगबॉस फेम डॉ. अभिजीत वामनराव आवाडे – बिचुकले (सातारा), सुरेशराव दिनकर कोरडे (फुलेनगर, वाई), संजय कोंडीबा गाडे (कुसुंबी, ता. जावली), निवृत्ती केरू शिंदे (शाहूनगर-गोडोली, सातारा), प्रतिभा शेलार (सोमवार पेठ, सातारा), सदाशिव साहेबराव बागल (गोवे, ता. जि. सातारा), मारुती धोंडीराम जानकर (केसकर कॉलनी, सातारा), विश्वजीत पाटील-उंडाळकर (उंडाळे, ता. कराड), सचिन सुभाष महाजन (बुध, ता. खटाव), सीमा सुनील पोतदार (पुसेसावळी, ता. खटाव).

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;