16 हजार कोटींची मालमत्ता कवडीमोल भावाने घेतली; डीएसके यांचा चार बिल्डरवर गंभीर आरोप

16 हजार कोटींची मालमत्ता कवडीमोल भावाने घेतली; डीएसके यांचा चार बिल्डरवर गंभीर आरोप

माझ्यावर जेवढं कर्ज होतं, त्यापेक्षा पाच ते सहा पट माझ्या मालमत्ता आहेत. परंतु नोटाबंदी, जीएसटीनंतर व्यवसायात थोडा बदल झाला. त्यामुळे अडचणी वाढत गेल्या; परंतु मी तुरुंगात असताना पुण्यातील चार बांधकाम व्यावसायिकांनी माझी मालमत्ता कवडीमोल भावाने विकत घेतली आहे. मला हा ठरवून केलेला बळीचा बकरा असल्याचा असा गंभीर आरोप बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी केला आहे.

डी. एस. कुलकर्णी यांनी आज प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना हा आरोप केला. ते म्हणाले, मी तुरुंगात असताना डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी पुण्यातील चार बांधकाम व्यावसायिकांनी कवडीमोल भावाने विकत घेतली, परंतु ते ठेवीदारांचे पैसे परत करण्यास तयार नाहीत. पुण्यातील चार बिल्डरांनी माझ्या 16 हजार कोटींच्या मालमत्ता अवघ्या 826 कोटी रुपयांना विकत घेतल्या आहेत. पुण्यातील डीएसके ड्रीम सिटी, बाणेर, बालेवाडी, मुंबई व इतर ठिकाणी असलेल्या 11 मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे कसे देऊ? दिवाळखोरीच्या कायद्याखाली माझ्या मालमत्ता विकत घेतल्या आहेत. त्याविरोधात मी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाने 10 मेपर्यंत या मालमत्ता विकण्यास स्थगिती दिली आहे.

मालमत्ता गोठवल्यामुळे पैसे कसे देणार?

माझ्या मालमत्तांवर टाच आणली आहे. त्यामुळे सध्या अंगावरील कपडे सोडता माझ्याकडे काहीच नाही. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे कसे देऊ, असा सवालही त्यांनी केला. 2017 मध्ये मला एकाच वेळी 32 हजार जणांनी पैसे मागितले होते. त्यामुळे जमेल तसे मी प्रत्येकाला पैसे देत होतो. मी आयुष्यात कधीही खोट बोललो नाही. माझ्या अपघातानंतर अफवा पसरवण्यात आली, असेही डी. एस. कुलकर्णी म्हणाले.

पैसे परत द्यायचे आहेत

मी दिवाळखोर नाही. मला गुंतवणूकदारांचे पैसे परत द्यायचे आहेत. माझ्या सर्व मालमत्ता आणि बँकेची खाती गोठवली आहेत. मला आणखी एक महिन्याचा कालावधी दिला असता तर सर्व मुद्दे निकाली लागले असते, असेही डी. एस. कुलकर्णी म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;