वैद्यकीय अधीक्षक पदावरून डॉ. तावरे यांची उचलबांगडी; डॉ. जाधव नवे अधीक्षक

वैद्यकीय अधीक्षक पदावरून डॉ. तावरे यांची उचलबांगडी; डॉ. जाधव नवे अधीक्षक

ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असताना उंदीर चावल्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी डॉ. अजय ताकरे यांची रूग्णालयाच्या कैद्यकीय अधीक्षक पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. रूग्णालयाच्या जनऔषध वैद्यकशास्त्र्ा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. यल्लापा जाधव यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षक पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून शुक्रवारी रात्री हा निर्ण़य घेण्यात आला.

अतिदक्षता विभागात उपचार घेत असताना सागर रेणुसे या तीस वर्षीय तरूणाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी केली होती. सागर याचा 15 मार्च रोजी रात्री अपघात झाला होता. यात तो गंभीर जखमी झाला होता. 16 मार्च रोजी त्याला ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघातात मणक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला क्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना सागरला उंदीर चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाइकांनी केली होती. तर मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे शककिच्छेदन अहकालात दिसून आल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले होते.

 या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयातील तीन प्राध्यापकांचा समावेश करण्यात आला होता. चौकशी समितीकडून  शवविच्छेदन अहवालासह अन्य बाबींची चौकशी करून हा अहवाल वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे पाठवण्यात आला होता. चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालावर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात आली असून वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजय तावरे यांची ंवैद्यकीय अधिक्षक पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी तीन तृतीय श्रेणी कर्मचाऱयांना कारणे दाखका नोटीसही बजाकण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;