आईनेच मुलीला एक लाखाला विकले, कोल्हापुरातील घटनेने खळबळ

आईनेच मुलीला एक लाखाला विकले, कोल्हापुरातील घटनेने खळबळ

पतीपासून विभक्त राहणाऱया महिलेने तिच्या एक वर्षाच्या मुलीला 500 रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर गोव्यातील एका दाम्पत्याला एक लाख रुपयांना विकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी मुलीचे वडील दिलीप विलास ढेंगे (वय 30, रा. इंगळी, ता. हातकणंगले) यांनी आज लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर मुलीची आई पूनम दिलीप ढेंगे (वय 25, मूळ रा. इंगळी; सध्या रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले), तिचा मित्र सचिन अण्णाप्पा कोंडेकर (वय 40, रा. शहापूर, इचलकरंजी), मध्यस्थी करणारा किरण गणपती पाटील (वय 30, रा. केर्ली, ता. करवीर) आणि गोवा येथील फातिमा फर्नांडिस व जेरी पॉल नोऱहान्हा या दाम्पत्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल झाला. यामध्ये पूनम ढेंगे, सचिन कोंडेकर आणि किरण पाटील या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप आणि पूनम यांचा सन 2018मध्ये विवाह झाला असून, त्यांना तीन वर्षांचा एक मुलगा आणि एक वर्षाची मुलगी आहे. कौटुंबिक वादामुळे गेल्या वर्षभरापासून पूनम ही पट्टणकोडोली येथे तिच्या आईकडे राहते. 13 एप्रिल रोजी पूनमने लहान मुलगी कोणाला तरी दत्तक दिल्याची माहिती सासूने फोन करून सांगितली. त्यानंतर दिलीप याने इचलकरंजीत सचिन कोंडेकर या मित्राकडे राहत असलेल्या पत्नी पूनमकडे जाऊन चौकशी केली. त्यावेळी मुलगी आष्टा (जि. सांगली) येथे एका पाळणाघरात असल्याचे तिने सांगितले. मुलीला भेटायचा आग्रह धरल्याने अखेर मुलीला गोव्यातील दाम्पत्याकडे 500 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर नोटरी करून एक लाख रुपयांना विकल्याचे तिने सांगितले.

त्यानंतर दिलीप ढेंगे यांच्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी पाचजणांवर गुन्हा दाखल करून तातडीने तिघांना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक रूपाली पाटील तपास करीत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;