400 पारच्या गप्पा मारणाऱयांनी 200 पार करून दाखवावे! जयंत पाटील यांचे भाजपला आव्हान

400 पारच्या गप्पा मारणाऱयांनी 200 पार करून दाखवावे! जयंत पाटील यांचे भाजपला आव्हान

भारतीय जनता पक्षाच्या 400 पारच्या नाऱयाची सर्वत्र खिल्ली उडवली जात आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते, आमदार जयंत पाटील यांनी तर भाजपला आज आव्हानच दिले. 400 पारच्या गप्पा मारणाऱयांनी 200 तरी पार करून दाखवावे, असे ते म्हणाले.

जयंत पाटील आज सोलापूरच्या अकलूजमध्ये आले होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना, या वेळी राजकीय चित्र महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात बदलणार आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असताना दिसतोय, त्यामुळे राजकीय चित्र मोठय़ा प्रमाणात बदलेल, असे पाटील म्हणाले. भाजपने देशात 200 आणि राज्यात 25 चा आकडा तरी पार करून दाखवावा, असे ते पुढे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;