पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप

भाजपाचे आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रम

पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप

चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक असा अभिनव व समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पिंपळे सौदागर परिसरात नागरिकांना १००० वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले.

पिंपरी :   चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक असा अभिनव व समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पिंपळे सौदागर परिसरात नागरिकांना १००० वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले.

वाढदिवसाचे औचित्य साधत समाजासाठी काहीतरी सकारात्मक व शाश्वत योगदान देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमातून “एक व्यक्ती – एक वृक्ष” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात आली. वाढत्या
IMG-20260406-WA0009
PCMC
नागरीकरणामुळे कमी होत चाललेले हरित क्षेत्र लक्षात घेता पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित करण्यात आली. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
 
या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया देताना उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे म्हणाले की, “आमदार शंकर भाऊ जगताप हे केवळ लोकप्रतिनिधी नसून जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी सातत्याने झटणारे कार्यसम्राट आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीत समाजहिताला नेहमीच प्राधान्य असते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वृक्ष वाटपासारखा उपक्रम राबवून त्यांच्या कार्याला साजेसा आणि समाजासाठी उपयुक्त संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आज लावलेला प्रत्येक वृक्ष हा भविष्यातील पर्यावरणाचा मजबूत पाया ठरेल.”
 
तसेच उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. कुंदा संजय भिसे यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, “आमदार शंकर जगताप यांची काम करण्याची धडाडी, जनसंपर्क आणि विकासाभिमुख दृष्टी ही खरोखर प्रेरणादायी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांना गती मिळाली आहे. त्यांच्याच प्रेरणेतून आम्ही हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविला. शहराचा विकास करताना पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज आहे, आणि अशा उपक्रमांमधून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”
 
या उपक्रमाद्वारे आमदार शंकर जगताप यांना ‘निसर्ग आरोग्यदायी शुभेच्छा’ देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश व्यापक स्वरूपात समाजात पोहोचविण्यात आला. सदर उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, पर्यावरण रक्षणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
 
याप्रसंगी उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे, उन्नती फाउंडेशन सभासद, ऑल सिनियर सिटीझन असोसिएशन, लिनियर गार्डन जेष्ठ नागरिक संघ, आनंद हास्य क्लब, विठाई वाचनालय, यांच्यासह पिंपळे सौदागर , रहाटणी मधील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार! ‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार!
‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार’’ हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण उद्योगविश्वासाठी प्रेरणादायी टप्पा आहे.
मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर द्या : खासदार श्रीरंग बारणे 
नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर : महापौर रवि लांडगे
पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप
Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स