आमदार आल्यावर डॉक्टर उभे राहिले नाही म्हणून शिस्तभंगाची कारवाई; हायकोर्टाने राज्य सरकारला ठोठावला 50 हजारांचा दंड

आमदार आल्यावर डॉक्टर उभे राहिले नाही म्हणून शिस्तभंगाची कारवाई; हायकोर्टाने राज्य सरकारला ठोठावला 50 हजारांचा दंड

आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याबद्दल एका डॉक्टरवर कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त  करत राज्य सरकारला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. हरियाणा येथील ही घटना आहे.

कोरोना महामारीच्या काळात डॉ. मनोज हे सरकारी रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्डमध्ये कर्तव्यावर होते आणि यावेळी एका आमदाराने या रुग्णालयाला भेट दिली होती. डॉक्टर मनोज यांनी त्यांना पाहिल्यानंतरही ते उभे राहिले नाहीत यावरून आमदार चिडले होते आणि त्यांनी मनोज यांना  कारणे दाखवा नोटीस  पाठवली होती. मनोज यांनी त्यांचे उत्तर जून 2024 मध्ये दाखल केले, ज्यामध्ये त्यांनी आपण आमदारांना ओळखले नाही त्यामुळे अजाणतेपणाने आपण उभे राहिलो नाही असे स्पष्ट केले. पण यासंबंधीचा निर्णय आजपर्यंत देण्यात आला नाही.

न्यायालयाचे म्हणणे

या घटनेवर आश्चर्य व्यक्त करत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हरियाणा राज्य सरकारला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. उच्च न्यायालयाने हरियाणा सरकारला त्या डॉक्टरला अडवून ठेवण्यात आलेले ना-हरकत प्रमाणपत्र तातडीने जारी करण्याचे निर्देशदेखील दिले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हंगाम जोरात; 135 लाख टन ऊस गाळप; तीन आठवड्यात 100 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन हंगाम जोरात; 135 लाख टन ऊस गाळप; तीन आठवड्यात 100 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू होऊन तीन आठवडे झाले. आतापर्यंत 135 लाख मॅट्रिक टन ऊस गाळप झाले असून...
चुटकीवाला भोंदूबाबा ठाण्यात जेरबंद; कोल्हापूर पोलिसांची कारवाई, पाच दिवसांची पोलीस कोठडी
मुंबईत 11 लाख दुबार मतदार कोणासाठी घुसवले! काँग्रेसचा सवाल
मध्य रेल्वेच्या भायखळा मेकॅनिकल इन्स्टिटय़ूटवर भगवा फडकला, रेल कामगार सेनेचा दणदणीत विजय
राज ठाकरे यांचा धोक्याचा इशारा, मुंबई हातातून गेली तर सत्ताधारी थैमान घालतील
चीनमध्ये लोळण्याची अनोखी स्पर्धा
पराभवाच्या भीतीनेच भाजपकडून फुटीचे राजकारण, हिंदू-मुस्लिम, मराठी-अमराठी लावालावी सुरू आहे; आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला