हैदराबाद विमानतळाला ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी, बहरीनहून येणारे विमान मुंबईला वळवले
हैदराबाद विमानतळाला ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्याने बहरीन-हैदराबाद विमान मुंबईत वळवण्यात आले. रविवारी पहाटे 3 वाजता हैदराबाद विमानतळाला एक मेल आला. यात गल्फ एअरलाईनच्या GF-274 बहरीन-हैदराबाद विमानात बॉम्ब असल्याचे म्हटले होते. यानंतर बहरीनहून हैदराबादला येणारे विमान तात्काळ मुंबईला वळवण्यात आले.
विमानात एकूण 154 प्रवासी होते. मुंबई विमानतळावर उतरताच सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. विमानाची तपासणी केली असता कोणतीही संशयित वस्तू आढळली नाही. यानंतर विमान मुंबईहून रवाना करण्यात आले आणि 11.31 वाजता हैदराबादला पोहचले.
याआधी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बच्या धमकीचा मेल शनिवारी आला होता. सुरक्षा यंत्रणांनी तात्काव विमानतळ परिसर मोकळा करत तपासणी केली असता ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले. बॉम्बचा खोटा मेल पाठवणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List