पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, शीतल तेजवानी यांना समितीची नोटीस
पार्थ अजित पवार यांच्या मुंढवा येथील जमीन घोटाळाप्रकरणी पूर्वी नोटीस बजावूनही गैरहजर राहिलेल्या कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांना खारगे समितीने नोटीस बजावली आहे. तेजवानी उद्या समितीपुढे हजर होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
मुंढवा येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारने अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली आहे. समितीने पार्थ पवार यांची 99 टक्के भागीदारी असलेल्या अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्यासह कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांना हजर राहण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानुसार, पाटील समितीपुढे हजर राहिले, मात्र तेजवानी गैरहजर राहिल्या होत्या. सलग दोन दिवस चौकशीनंतर नैसर्गिक न्यायानुसार तेजवानी यांना समितीने मुदत देऊन सोमवारी हजर राहण्याचा आदेश दिला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List