फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई तीव्र, 9.63 लाख प्रवाशांकडून 40.59 कोटी रुपये वसूल

फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई तीव्र, 9.63 लाख प्रवाशांकडून 40.59 कोटी रुपये वसूल

एक्सप्रेस, मेल आणि उपनगरी गाड्यांमध्ये विनातिकिट, अवैध तिकिट आणि बुकिंग न केलेल्या सामानासह प्रवास करणाऱ्या 9.63 लाख प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाई केली आहे. मुंबई विभागातील तिकिट तपासणी पथकाने अशा प्रवाशांकडून 40.59 कोटी रुपये दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मेल-एक्सप्रेस गाड्या, वातानुकुलीत व गैर-वातानुकुलीत उपनगरी गाड्यांमधील अनियमित प्रवास रोखण्यासाठी नियमित विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे.

आर्थिक वर्ष 2025-26 (एप्रिल ते ऑक्टोबर 2025) दरम्यान, मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी पथकांनी मेल-एक्सप्रेस गाड्या, उपनगरी गाड्या तसेच वातानुकूलित उपनगरी गाड्यामध्ये मिळून 9.63 लाख अनियमित प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत एकूण 40.59 कोटी रुपये दंड म्हणून वसूल केला.

एप्रिल ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील दंडवसूली पुढीलप्रमाणे

  • वातानुकूलीत उपनगरी गाड्यांमधून 2.28 कोटी रुपये दंड वसूल
  • प्रथम श्रेणी डब्यांमधून 2.93 कोटी रुपये दंड
  • द्वितीय श्रेणी डब्यांमधून 33.69 कोटी रुपये दंड
  • मेल व एक्सप्रेस गाड्यांमध्ये भाडेफरकाच्या प्रकरणांमधून 0.71 कोटी रुपये दंड
  • बुकिंग न केलेल्या सामानामधून 0.98 कोटी रुपये दंड

ऑक्टोबर 2025 महिन्यात एकूण 1.34 लाख अनियमित प्रवासाच्या प्रकरणांची नोंद झाली असून 6.16 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.

ऑक्टोबर 2025 मधील दंडवसूली पुढीलप्रमाणे

  • वातानुकूलीत लोकलमधून 29.28 लाख रुपये दंड
  • प्रथम श्रेणी डब्यांमधून 34.07 लाख रुपये दंड
  • द्वितीय श्रेणी डब्यांमधून 5.21 कोटी रुपये दंड
  • मेल व एक्सप्रेस गाड्यांतील भाडेफरक प्रकरणांमधून 1.92 लाख रुपये दंड
  • बुकिंग न केलेल्या सामानामधून 1.25 लाख रुपये दंड

मध्य रेल्वेने मुंबई विभागातील वातानुकूलीत उपनगरी गाड्यांमध्ये आढळणाऱ्या अनियमित प्रवासाच्या समस्या लक्षात घेऊन एक विशेष वातानुकूलीत लोकल तिकीट तपासणी पथक नियुक्त केले आहे. मुंबई उपनगरी विभागात मध्य रेल्वेमार्फत दररोज 1,810 गाड्यांची वाहतूक केली जाते, यात 80 वातानुकूलीत लोकल सेवा समाविष्ट आहेत. या विशेष पथकाची नियुक्ती प्रवाशांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी करण्यात आली असून, यासाठी 24×7 कार्यरत व्हॉट्सअ‍ॅप तक्रार क्रमांक 7208819987 उपलब्ध करून देण्यात आला आहे. वातानुकूलीत लोकल तिकीट तपासणी पथक दररोज सरासरी 1.19 लाख दंडाची वसुली करते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निश्चितपणे निवडणुकीत घोटाळे झाले, पण…; प्रशांत किशोर यांनी केले स्पष्ट निश्चितपणे निवडणुकीत घोटाळे झाले, पण…; प्रशांत किशोर यांनी केले स्पष्ट
बिहारमधील विधानसभा निवडणुकीत भाजप-जदयू आघाडीला राक्षसी बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत निश्चितपणे घोटाळे झाले आहेत, हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे....
IND Vs SA ODI Series – केएल राहुलच्या नेतृत्वात टीम इंडियाची घोषणा, मराठमोळ्या खेळाडूची संघात एन्ट्री
मालगुंडमध्ये रंगली विटीदांडूची स्पर्धा; पारंपारिक खेळाला शिवसैनिकांनी दिली संजीवनी
Photo – प्रदूषित हवेने मुंबईकरांची चिंता वाढवली
जिंकण्याची शक्यता नसल्याने हिंदू-मुस्लिम, मराठी-अमराठी करण्याचे भाजपचे राजकारण सुरू; आदित्य ठाकरे यांचा घणाघात
Nanded News – हदगावच्या नायब तहसीलदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; गुन्हा दाखल
फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई तीव्र, 9.63 लाख प्रवाशांकडून 40.59 कोटी रुपये वसूल