मुंबईत 11 लाख दुबार मतदार कोणासाठी घुसवले! काँग्रेसचा सवाल

मुंबईत 11 लाख दुबार मतदार कोणासाठी घुसवले! काँग्रेसचा सवाल

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असून त्यात सुमारे 11 लाख दुबार मतदार आहेत, असा आरोप काँग्रेस आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांनी केला आहे. हे दुबार मतदार कुणासाठी यादीत घुसवले गेलेत, असा सवालही त्यांनी केला आहे.

महानगरपालिका निवडणुकीत अवघ्या काही मतांनीही उमेदवार विजयी होतात. अशा परिस्थितीत इतक्या मोठ्या संख्येने दुबार मतदार असणे गंभीर असल्याचे आमदार गायकवाड यांनी म्हटले आहे. मुंबई शहरात सुमारे तीन लाख, पूर्व उपनगरात साडेतीन लाख तर पश्चिम उपनगरात सर्वाधिक सुमारे पाच लाख दुबार मतदार आहेत. काही ठिकाणी तर दोन पेक्षा जास्त वेळा मतदारांची नावे यादीमध्ये आहेत, अशी माहिती आमदार गायकवाड यांनी दिली आहे.

निवडणूक आयोग ढिम्म

मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत. लाखो दुबार मतदार आहेत. मृत्यू पावलेल्या मतदारांची नावेही यादीमधून वगळली गेलेली नाहीत. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान होण्याची शक्यता आहे. याकडे विरोधी पक्षांनी सातत्याने लक्ष वेधल्यानंतरही निवडणूक आयोग ढिम्म बसून आहे. मतदार यादीतून नावे हटवण्याचा अधिकार आम्हाला नाही असा दावा आयोगाने केला आहे. मात्र सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना यादीतील दुबार नावे शोधा व दुबार मतदान होणार नाही याची खात्री करा, असे आदेश आयोगाने दिले आहेत.

…अशी आहे दुबार मतदारांची संख्या

  • पश्चिम उपनगर – 4 लाख 98 हजार 597
  • पूर्व उपनगर – 3 लाख 29 हजार 216
  • मुंबई शहर – 2 लाख 73 हजार
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हंगाम जोरात; 135 लाख टन ऊस गाळप; तीन आठवड्यात 100 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन हंगाम जोरात; 135 लाख टन ऊस गाळप; तीन आठवड्यात 100 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू होऊन तीन आठवडे झाले. आतापर्यंत 135 लाख मॅट्रिक टन ऊस गाळप झाले असून...
चुटकीवाला भोंदूबाबा ठाण्यात जेरबंद; कोल्हापूर पोलिसांची कारवाई, पाच दिवसांची पोलीस कोठडी
मुंबईत 11 लाख दुबार मतदार कोणासाठी घुसवले! काँग्रेसचा सवाल
मध्य रेल्वेच्या भायखळा मेकॅनिकल इन्स्टिटय़ूटवर भगवा फडकला, रेल कामगार सेनेचा दणदणीत विजय
राज ठाकरे यांचा धोक्याचा इशारा, मुंबई हातातून गेली तर सत्ताधारी थैमान घालतील
चीनमध्ये लोळण्याची अनोखी स्पर्धा
पराभवाच्या भीतीनेच भाजपकडून फुटीचे राजकारण, हिंदू-मुस्लिम, मराठी-अमराठी लावालावी सुरू आहे; आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला