Kankavli Nagar Panchayat Election – कणकवलीत राजकीय वातावरण तापले, पोलीस बंदोबस्त वाढवला
कणकवली नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरविकास आघाडी विरुध्द भाजप अशी दुरंगी लढत होत आहे. दोन्ही बाजुच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप होत असल्याने राजकीय दृष्ट्या वातावरण तापले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज झाले असून कणकवलीत खबरदारी घेण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात संचलन करत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली शहरात सायंकाळी पोलिसांनी संचलन केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे व दंगल नियंत्रक पथक यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List