निवडणूक आयोगाच्या देशद्रोही कृत्यांचा गौप्यस्फोट करणार, आदित्य ठाकरे यांचा इशारा

निवडणूक आयोगाच्या देशद्रोही कृत्यांचा गौप्यस्फोट करणार, आदित्य ठाकरे यांचा इशारा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मतदार यादीमधील घोळ पुराव्यानिशी समोर आणला होता. आता पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या देशद्रोही कृत्यांचा लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात एक्स पोस्ट करत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादीच्या प्रकाशन तारखेचा घोळ समोर आणला आहे. महापालिकेच्या मध्यवर्ती निवडणूक यंत्रणेकडे रितसर शुल्क भरून शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने मुंबईची प्रारूप मतदार यादी घेतली. त्या यादीवर 14 नोव्हेंबर 2025 ही तारीख आहे. सुरुवातीला ती 7 नोव्हेंबरला येणार होती. मग 14 नोव्हेंबर आणि शेवटी 20 नोव्हेंबरला ऑनलाईन प्रकाशित झाली, असे ट्विटमध्ये नमूद करतानाच, आदित्य ठाकरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

आयोगाला सवाल

g 14 तारखेला जी प्रारूप यादी तयार होती, ती कोणाला दिली?

g बाकीच्यांना ही यादी देण्यासाठी दिरंगाई का?

g की यादीमध्ये काही गडबड करायची होती म्हणून थांबलात?

g कोणाच्या आदेशाची वाट पाहत होतात?

g ही यादी मशीन रिडेबल का नाही?

g तुमचा देशद्रोह पकडला जाईल म्हणून…?

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देश-विदेश – चिलिकाचे सरोवर पक्ष्यांनी गजबजले देश-विदेश – चिलिकाचे सरोवर पक्ष्यांनी गजबजले
हिवाळ्याची चाहूल लागताच चिलिका शहर पक्ष्याच्या किलबिलाटाने गजबजले आहे. आशियातील हा सर्वात मोठा खाऱ्या पाण्याचा सरोवर आहे. या विस्तीर्ण सरोवरात...
20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली! उद्या ‘सुप्रीम’ सुनावणी… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबण्याची चिन्हे
निवडणूक आयोगाच्या देशद्रोही कृत्यांचा गौप्यस्फोट करणार, आदित्य ठाकरे यांचा इशारा
न्या. सूर्य कांत आज घेणार शपथ, पाच कोटी प्रलंबित खटल्यांचे नव्या सरन्यायाधीशांपुढे आव्हान
भाजपनं आमचं कंबरडं मोडलं, गुलाम बनवताहेत आम्हाला! शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील यांचा जाहीर आरोप
मते कमी पडली तर परिणाम भोगावे लागतील, मुश्रीफ यांनी भरला दम
विज्ञानरंजन – स्थैर्य जल