TET चा पेपर फोडण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद, 9 जण ताब्यात; स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मुरगूड पोलिसांची कारवाई

TET चा पेपर फोडण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद, 9 जण ताब्यात; स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मुरगूड पोलिसांची कारवाई

संपूर्ण राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) सुरू आहे. या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मुरगुड पोलिसांनी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या मदती केला असून कागल तालुक्यातील सोनगे गावातून नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. प्रकरणाची व्याप्ती फार मोठी असून यात अनेक लोक गुंतले असण्याची शक्यता आहे. मुरगुड पोलीस या घटनेचा जलदगतीने तपास करत आहेत.

आज राज्यभरामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेसाठी लाखो परीक्षार्थी शिक्षक राज्यातील अनेक केंद्रांवर ही परीक्षा देत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात हा पेपरच फोडण्याचा प्रयत्न झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये काही शाळेतील परीक्षार्थी शिक्षकांचाही सहभाग असून हे सर्व आरोपी कागल तालुक्यातील सोनगे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले संशयित कागल आणि राधानगरी तालुक्यातील आहेत.

पेपर फुटीच्या घटनेची मुरगूड पोलिसांना कुणकुण होती. त्यामुळे शनिवार सायंकाळपासून रात्रभर पोलीस या घटनेचा तपास करत होत . रविवारी मध्यरात्री पोलीस पथकाने या टीईटी पेपर फोडणाऱ्या टोळीला सोनगे येथून जेरबंद केले. पोलीस तपासात अनेक धक्कादायक नावे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली, विवाहसोहळा पुढे ढकलला स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली, विवाहसोहळा पुढे ढकलला
टीम इंडियाची स्टार महिला स्मृती मानधना हिचे आज प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छाल याच्यासोबत लग्न होणार होते. सांगली येथे रविवारी हा...
शिवानी सावंत-माने यांना वाढता पाठींबा, महाविकास आघाडीचा धुमधडाक्यात प्रचार
हिंदुस्थानच्या महिला दृष्टीहीन संघाने जिंकला टी-20 वर्ल्डकप, फायनलमध्ये नेपाळचा केला पराभव
अमेरिकेचा संभाव्य धोक्याचा इशारा; जगभरातील अनेक देशांकडून व्हेनेझुएलाला जाणारी उड्डाणे रद्द
बिहारप्रमाणे तामिळनाडूमधील ‘एसआयआर’ वादात; अभिनेता विजयच्या पक्षाची सुप्रीम कोर्टात धाव
TET चा पेपर फोडण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद, 9 जण ताब्यात; स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मुरगूड पोलिसांची कारवाई
वयोमानापरतवे होणाऱ्या विस्मृतीवर हे आहेत खात्रीशीर उपाय, जाणून घ्या