चाकवत भाजीने कोणते आजार बरे होतात? ही भाजी कोणी खाऊ नये ?
चाकवत भाजी हिवाळ्यात भरपूर प्रमाणात बाजारात येत असते. चाकवत भाजीचा आहारात समावेश अनेक वर्षांपासून केला जात आहे.थंडीत खास करुन ही भाजी आवर्जून केली जाते. ही भाजी चवीला तर चांगली असतेच शिवाया शरीरालाही मजबूत बनवते. आयुर्वेदात या भाजीला नैसर्गिकपणे शरीर डिटॉक्स करणारी भाजी म्हटले जाते. चाकवत भाजीला चंदनबटवा आणि हिंदीत बथुआ म्हणतात. या भाजीचे गुणधर्म काय आणि कोणी ही भाजी खाऊ नये हे पाहूयात…
चाकवत खाल्ल्याने कोणते आजार बरे होतात ?
चाकवत भाजीत विटामिन A, C, आयर्न आणि कॅल्शियम भरपूर असते. ही भाजी डायजेशन दुरुस्त करते. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते. ज्या लोकांना गॅस, एसिडीटी आणि पोट फुगणे अशा तक्रारी असतील त्यांच्यासाठी ही भाजी औषधापेक्षा काही कमी नाही.
चाकवत रक्त देखील शुद्ध करते. त्वचेला चमकदार बनवते. शरीरातील विषारी टॉक्सिन्स बाहेर टाकते. जर तुम्हाला संधीवात, गुडघे दुखी, ब्लड प्रेशर तर ही भाजी फायदेशीर ठरते. थंडीत तुमच्या रोजच्या आहारात या भाजीचा समावेश केला तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. तसेच शरीरात उष्णताही वाढेल. मात्र चाकवत खाताना काही पथ्येही पाळावी लागतात.
चाकवतचा पराठाही खाल्ला जातो. थोड तूप टाकून जर गरमागरम चाकवतचा पराठा मिळाला तर याच्या सारखा पौष्ठीक नाश्ता नाही. ही भाजी पौष्ठीक आणि चवीलाही चांगली आहे.
कोणी चाकवत खाऊ नये ? ( Who should not eat Bathua?)
चाकवत भाजी ही उष्ण गुणधर्माची आहे. त्यामुळे ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी ही भाजी मर्यादित प्रमाणात खावी. कारण या भाजीत ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे किडनी किंवा मुतखडा होऊ शकतो.तसेच गर्भवती महिलांनी देखील ही भाजी डॉक्टरांना विचारुन खावी.
चाकवत बद्धकोष्ठतेसाठी चांगली ?
चाकवत भाजीत मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे मल त्यागताना मोठी मदत होते. पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यात ही भाजी रामबाण आहे. पचनाच्या सर्व समस्या या भाजीमुळे दूर होतात.पचन यंत्रणा जर चांगली राखायची असेल तर चाकवत खाणे चांगले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List