Video बालवाडीतील मुलांना येतात हजार पर्यंतचे पाढे, सर्व विद्यार्थी दोन्ही हातांनी लिहतात; अशी आहे नाशिकमधली ही जिल्हा परिषद शाळा
जिल्हा परिषद शाळांमधल्या मुलांच्या शिक्षणावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र नाशिकमधल्या त्रंब्यकेश्वर
तालुक्यातील हिवाळी गावातील जिल्हा परिषद शाळा ही जगावेगळी ठरत आहेत. या शाळेतील विद्यार्थी हे दोन्ही हातांनी लिहतात तर अगदी बालवाडीतील मुलांना हजारपर्यंतचे पाढे येतात.
केशव गावित हे या शाळेत शिक्षक असून ते दररोज 12 तास या शाळेत शिकवतात. या शाळेतील बालवाडीतील मुलांना हजार पर्यंतचे पाढे येतात. ही मुलं न चुकता पाढे जेव्हा बोलतात तेव्हा आपल्याला थक्क होऊन जायला होते.
केशव सरांनी मुलांना दोन्ही हातांनी लिहायला शिकवले आहे. त्यामुळे या मुलांची लिखाणाचा स्पीड देखील जास्त आहे. तसंच बालवाडीतील मुलं चौथी पाचवीच्या विद्यार्थ्यांची गणितं सोडवतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
(@sidiously)
Comment List