गेलच्या पाईपलाईनमध्ये बिघाड, मुंबई, ठाणेसह नवी मुंबईमध्ये सीएनजी पुरवठ्यावर परिणाम

गेलच्या पाईपलाईनमध्ये बिघाड, मुंबई, ठाणेसह नवी मुंबईमध्ये सीएनजी पुरवठ्यावर परिणाम

चेंबूरमधील आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने मुंबई, ठाणेसह नवी मुंबईत सीएनजी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे रिक्षा, टॅक्सी, बस, खाजगी वाहनांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र घरगुती गॅस पुरवठा सुरळीत सुरू राहणार असल्याचं महानगर गॅस लिमिटेडने स्पष्ट केले आहे.

गेलच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने वडाळा येथील MGLच्या सिटी स्ठेशनला होणारा सीएनजी गॅस पुरवठा प्रभावित झाला आहे. यामुळे मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील वाहनधारकांना सीएनजी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असून लवकर सीएनजी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे महानगर गॅस लिमिटेड कंपनीने निवेदनाद्वारे सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

’टीआरएफ’ने घेतली दिल्ली बॉम्बस्फोटाची जबाबदारी ’टीआरएफ’ने घेतली दिल्ली बॉम्बस्फोटाची जबाबदारी
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी ’द रेझिस्टेन्स फोर्स’ (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने...
शिवसेनाप्रमुखांना अनोखी आदरांजली, सलग 155 महिने 17 तारखेला रक्तदान, शिबिराचा कार्ययज्ञ
ट्रेंड – तरुणी बनवत होती रील, अचानक आले माकड आणि केला विचका
आज सोंडोलीत दोन महाराष्ट्र केसरींची दंगल
जिजामाता नगर गणेशोत्सव मंडळातर्फे महाआरोग्य शिबीर
अक्षया ठोंबरे यांना उत्कृष्ट सुलेखनकाराचा जागतिक पुरस्कार
गेलच्या पाईपलाईनमध्ये बिघाड, मुंबई, ठाणेसह नवी मुंबईमध्ये सीएनजी पुरवठ्यावर परिणाम