तोंडात वारंवार अल्सर होत आहे, रामदेव बाबांनी सांगितले आयुर्वेदिक उपाय
अनेक लोक वारंवार तोंड येण्याच्या समस्येने त्रस्त असतात. त्यामुळे त्यांना जेवणाचा नीट आस्वाद घेता येत नाही. ही समस्या कमजोर पचन यंत्रणा, विटामिन्स बी -12, आयर्न वा फोलिक एसिडच्या कमतरतेने, शरीरातील उष्णता वाढणे, तणाव, अधिक मसालेदार वा खारट जेवण,धुम्रपान आणि अपुरी झोप यामुळे देखील होऊ शकते. काही वेळा धारदार दांतामुळेही तोंडात जखमा होत असतात. हवामान बदल आणि हार्मोन असंतुलन देखील तोंडातील व्रणाला कारणीभूत असते. रामदेव बाबा यांनी आयुर्वेदिक पद्धतीने तोंडातील व्रण आणि त्यापासून बचावाचे उपाय सांगितले आहेत.
जर वारंवार तोंड येत असेल किंवा व्रण पडत असतील तर त्यांचा वेळीच उपाय करायला हवा. अन्यथा नंतर गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे अन्न गिळणे, बोलणे आणि दात स्वच्छ करताना देखील त्रास होत असतो. वारंवार तोंडाचा अल्सर झाल्याने तोंडात संक्रमण वाढ शकते. त्यामुळे तोंडातून दुर्गंधी येणे आणि चव बिघडणे सारख्या अडचणी येऊ शकतात. बराच काळ याकडे दुर्लक्ष केले तर तुमची इम्युन सिस्टीम देखील कमजोर होऊ शकते. शरीरात सूज येऊ शकते. वेदना आणि जळजळ यामुळे तुम्ही नीट जेऊ शकणार नाही. त्यामुळे वजन कमी होणे किंवा कमजोरी येणे असे त्रास होऊ शकतात.त्यामुळे तोंडाच्या अल्सरचा वेळीच उपचार करणे गरजेचे असते.
बचावासाठी आयुर्वेदिक उपाय –
तोंडाच्या अल्सरवर आराम मिळण्यासाठी एलोवेरा सर्वात उत्तम उपाय असल्याचे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. याचे रोज सकाळी उपाशी पोठी सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होते. पचन मजबूत होते आणि इम्युन सिस्टीम मजबूत होते. तोंडाच्या व्रणांवर एलोवेरा जेल लावल्याने जळजळ,वेदना आणि सूज यावर लागलीच आराम मिळतो. याशिवाय शरीर थंड होण्यासाठी कलींगड, काकडी, नारळपाणी आणि ताक सारख्या थंड पेयांचे सेवन करायला हवे. मसालेदार, तळलेले आणि अत्यंत खारट, आबंट पदार्थ वर्ज्य करावेत.
दररोज पुरेसे पाणी प्यावे, संतुलित आहार करावा, नियमित योग आणि ध्यान धारण करावी त्यामुळे देखील ताण कमी होऊन आराम मिळतो. तणाव कमी करणे, झोप पूर्ण घेणे आवश्यक आहे. कारण जास्त तणाव आणि झोपेच्या कमतरतेने तोंड येण्याची समस्या वारंवार येऊ शकते. आयुर्वेदिक उपाय आणि लाईफस्टाईल मधील बदलाने तोंडाच्या आरोग्याचे रक्षण होते. आणि माऊथ अल्सरची समस्या बरी होते.
हे देखील आवश्यक –
तोंडाची स्वच्छता नीट राखा, दिवसातून दोन वेळा ब्रश करा
अधिक आबंट फळे किंवा खूप गरम अन्न खाणे टाळा.
पचन सुधारण्यासाठी फायबर युक्त डाएट घ्या
धूम्रपान,मद्य आणि तंबाखूपासून दूर राहा
वारंवार तोंड येत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्या
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List