IND vs SA Kolkata Test – हार्मरच्या फिरकीत अडकली टीम इंडिया, दक्षिण आफ्रिकेचा 30 धावांनी थरारक विजय

IND vs SA Kolkata Test – हार्मरच्या फिरकीत अडकली टीम इंडिया, दक्षिण आफ्रिकेचा 30 धावांनी थरारक विजय

कोलकाता कसोटीत पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने हिंदुस्थानवर 30 धावांनी विजय मिळवत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेने चौथ्या डावात हिंदुस्थानपुढे 124 धावांचे आव्हान ठेवले होते. खेळपट्टीचा नूर पाहता हे आव्हानही डोंगराएवढे ठरणार असे वाटत होते आणि झालेही तसेच.

हिंदुस्थानचा संपूर्ण संघ 93 धावा करू शकला आणि आफ्रिकेने विजय मिळवला. शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे मैदानात उतरू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून सिमॉन हार्मर याने दोन्ही डावात मिळून 8 विकेट्स घेतल्या. त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पहिल्या डावात हिंदुस्थानने आफ्रिकेला 159 धावामध्ये गुंडाळले होते. हिंदुस्थानला पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी होती, मात्र एकही फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे हिंदुस्थानचा संघ 189 धावा करू शकला. हिंदुस्थानला 30 धावांची नाममात्र आघाडी घेतली. त्यानंतर आफ्रिकेने दुसऱ्या डावात 153 धावा केल्या. कर्णधार तेंबा बावुमा याने नाबाद 55 धावांची खेळी केली. हीच खेळी निर्णायक ठरली.

धावफलक

दक्षिण आफ्रिका – 159 आणि 153

हिंदुस्थान – 189 आणि 93

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिवाळ्यात तुमचे शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘या’ फळांचा आहारात करा समावेश हिवाळ्यात तुमचे शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘या’ फळांचा आहारात करा समावेश
हिवाळा ऋतू सुरू झाला आहे. या ऋतूत बहुतेकजण त्यांच्या आहारात गरम पदार्थांचा समावेश करण्यास सुरुवात करतात कारण या थंड वातावरणात...
तुम्हीही रात्री कणिक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता का? आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो?
अभिनेते प्रेम चोप्रा यांना डिस्चार्ज, लीलावती रुग्णालयात ८ दिवस सुरु होते उपचार
‘मायसभा’ चा पहिला पोस्टर प्रदर्शित; जावेद जाफरीच्या अनोख्या लूकची चर्चा
दर्शनासाठी जाताना टेम्पो आणि ट्रेलरची समोरासमोर धडक, 6 भाविकांचा मृत्यू; 14 जखमी
नेपाळ, फ्रान्सनंतर आता मेक्सिको! भ्रष्टाचारी सरकारविरोधात Gen Z उतरले रस्त्यावर
छत्तीसगडच्या सुकमामध्ये चकमक, 5 लाख रुपयांचे बक्षीस असलेले 3 नक्षलवादी ठार