Latur News – शेतात जात असताना बैलगाडीसह शेतकरी तेरणा नदीत वाहून गेला, बचाव पथकाकडून शोध सुरू
शेतात रब्बीची पेरणी करण्यासाठी बैलगाडीत पेरणीचे सर्व साहित्य घेवून जात असताना शेतकरी बैलगाडीसह तेरणा नदीत वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. बेपत्ता शेतकऱ्याचा शोध सुरू आहे. निलंगा तालुक्यातील पाणंदजवळ रविवारी सकाळी ही घटना घडली. कमलाकर शिंदे (55) असे बेपत्ता शेतकऱ्याचे नाव आहे.
निलंगा तालुक्यातील गुंजरगा येथील शेतकरी कमलाकर शिंदे हे रविवारी सकाळी शेतात रब्बीची पेरणी करण्यासाठी बैलगाडीतून मांजरा नदी पाञाच्या काठावरून पाणंद रस्त्याने चालले होते. यादरम्यान अचानक गाडीचा चाक नदी पाञात गेल्याने गाडी पलटी झाली आणि शेतकरी एका बैलासह पाण्यात बाहून गेला. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मागील महिनाभर लातूर जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्याने तेरणा आणि मांजरा नदी पाञालगतच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. अतिवृष्टीने पाणंद रस्त्याचीही वाट लागली आहे. औराद शाहजानी ठाण्यातील पोलीस कर्मचारी आणि महसूल प्रशासन वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा आणि बैलाचा शोध घेत आहेत. तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List