प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी दरीत कोसळली; 40 जण जखमी

प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी दरीत कोसळली; 40 जण जखमी

जव्हारमध्ये आज मोठी बस दुर्घटना टळली. जव्हारहून भरधाव निघालेल्या एसटी बसचे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चोथ्याची वाडी येथे अचानक ब्रेक फेल झाले. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस दरीत कोसळली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जवळपास ४० प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान खटारा गाड्यांमुळे दिवसेंदिवस ग्रामीण भागात एसटी बसेसचे अपघात वाढले असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अपघातग्रस्त बस (एम.एच.१४-बी.टी. २३४१) जव्हार येथून ऐना येथे जात होती. मात्र घाट उतरत असताना एसटीच्या इंजिनमधून मोठा आवाज झाला. घाबरून चालक सुभाष गावीत याने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रेक लागला नाही. त्यानंतर ही गाडी विजेच्या खांबाला धडकून एका पडीक घरावर कोसळून रस्त्याच्या कडेला दरीत आडवी झाली. या अपघातात ४० प्रवासी जखमी झाले असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांना नाशिक येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे, तर अन्य जखमींवर जव्हारच्या कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रवाशांना खिडकीतून बाहेर काढले

भरधाव एसटीचा आणखी एक अपघात जव्हारमध्ये घडला आहे. जव्हारहून पालघरकडे जाणारी एसटी (एम.एच.४८-डी.सी.४५०९) कासटवाडी घाटात समोरून येणाऱ्या कारवर धडकली. त्याचवेळी घरंगळत आलेल्या भल्या मोठ्या दगडामुळे ही बस दरीच्या तोंडावर जाऊन अडकली. यावेळी प्रसंगावधान राखून प्रवाशांना सुखरूपपणे खिडकीवाटे बाहेर काढण्यात आले. यात कोणीही जखमी झाले नाही.

गंभीर जखमींची नावे

नीलिमा टोकरे, गुलाब मातरा, जानू बोंबे, वृषाली गरेल, रुचिता गवारी, विलास गवारी, रीना मातेरा, सुनील पवार, लवेश मुकणे.

कर्जतमध्ये कारने चार वाहनांना चिरडले

 वकिलाच्या भरधाव कारने सहा दुचाकींना चिरडल्याची घटना आज कर्जत नगर परिषद कार्यालयासमोर घडली. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही टाटा हॅरिअर कार बौद्ध वाडा येथील कमानीवर जाऊन आदळली. अपघातात एका ट्रॅफिक हवालदारासह सहा दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कारमध्ये (एम.एच.०१-डीटी ४६०१) हायकोर्टाचे वरिष्ठ वकील संजय खेर आणि कर्जतचे अॅड. राजेंद्र निगुडकर हे चालकासह प्रवास करत होते.

कर्जतच्या शांतीनगर परिसरात एका आयवा डंपरचा ब्रेक फेल झाल्याने या ट्रकने दोन दुचाकी, दोन रिक्षा तसेच इको गाडीला धडक दिली. सुदैवाने यात जीवितहानी टळली.

खारघरमध्येही स्विफ्ट कारवरील चाल काचे नियंत्रण सुटल्याने ही गाडी २५ फूट नाल्यात कोसळली. अपघातात कारचालक जोबिन केनेबोनो याचा मृत्यू झाला

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चिंचणीच्या भाजप सरपंचाचा विकास निधीवर डल्ला, 10 सदस्यांची तक्रार चिंचणीच्या भाजप सरपंचाचा विकास निधीवर डल्ला, 10 सदस्यांची तक्रार
डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीच्या भाजप सरपंच मेघा शिंगडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतीतील दहा सदस्यांनी विकास निधीच्या गैरवापरासह अनेक गंभीर आरोप करत...
नवी मुंबईत 100 हेक्टरवर उभी राहणार आंतरराष्ट्रीय एज्युसिटी
प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी दरीत कोसळली; 40 जण जखमी
रविवार ठरला अपघात वार! 24 तासात 4 भीषण अपघातांमध्ये 17 जण ठार; 40 हून अधिक जखमी
भाजप, अजित पवार गट कारस्थानी, शिंदे गटाच्या आमदाराची आगपाखड
वसईच्या टोलनाक्यासाठी सरनाईकांनी दिलेल्या पत्राला गडकरींची केराची टोपली
Delhi Blast News : दिल्लीत स्फोटाच्या ठिकाणी आढळले तीन काडतूस, टेरर फंडिंगचाही शोध सुरू