‘मायसभा’ चा पहिला पोस्टर प्रदर्शित; जावेद जाफरीच्या अनोख्या लूकची चर्चा
‘तुंबाड’ या सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला तसं यश मिळालं नसलं तरी सोशल मीडियावरील पब्लिसिटीचा या सिनेमाला प्रचंड फायदा झाला. यात महाराष्ट्रातील एक अनोखी कथा पाहायला मिळाली. आता याच चित्रपटाच्या दिग्दर्शकाने म्हणजेच राही अनिल बर्वे याने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केलीये. ‘मायसभा’ असं या सिनेमाचं नाव असून या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झालाय.
या चित्रपटात अभिनेता जावेद जाफरी मुख्य भूमिका साकारणार आहे. चित्रपटसृष्टीत काळ बदलतो तसतसे पात्रेही बदलतात. नुकताच जावेद जाफरी चा ‘मायासभा’ या चित्रपटातला पहिला लूक समोर आला आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीतील अनोखा लूक त्याने साकारला आहे. त्याच्या या अनोख्या लूकची चाहत्यांमध्ये चर्चा आहे.
या लूकमध्ये त्याचे केस पांढरे झालेत तर मास्क लावूनच तो श्वास घेताना दिसतोय. त्याच्या चेहऱ्याला आणि केसावर सोनं आहे. जावेद जाफरी हा इंडस्ट्रीतील सर्वात हरहुन्नरी आणि विविध भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. त्याने अनेक चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाने अनेकांना भूरळ पाडली आहे. तो एक प्रसिद्ध मिमिक्री कलाकार देखील आहे. आता त्यांच्या या वेगळ्या लूकची चर्चा होत आहे.
जावेद जाफरी यांनी स्वतः पोस्टर शेअर करत लिहिले आहे की, “ही मी वाचलेली सर्वोत्तम पटकथा आहे आणि ती तितकीच शक्तिशाली आहे. ही भूमिका शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक होती आणि माझ्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत मी यापूर्वी कधीही अशी भूमिका साकारली नाही. हा एक पूर्ण थरार होता आणि @rahianilbarve सोबत काम करणे हा एक उत्तम अनुभव होता. मी या चित्रपटाबद्दल उत्साहित आहे आणि मला विश्वास आहे की प्रेक्षकांना तो आवडेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List