काम राहिले अपूर्ण; ठेकेदाराला पैसे दिले पूर्ण, डहाणूतील चळणी ग्रामपंचायतीचा अजब कारभार

काम राहिले अपूर्ण; ठेकेदाराला पैसे दिले पूर्ण, डहाणूतील चळणी ग्रामपंचायतीचा अजब कारभार

पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदाराला डहाणूतील चळणी ग्रामपंचायतीने पूर्ण पैसे दिले आहेत. ठेकेदाराने पाण्याची टाकी बसवली पण मुख्य पाइपलाइनला जोडलीच नाही त्यामुळे पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. लाखो रुपये खर्चुन ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याने ग्रामपंचायतीच्या अजब कारभाराविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

मुबलक पाऊस पडूनही पालघरमधील ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत. महिलांना पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. ग्रामस्थांची फरफट थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीने पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून 2024 मध्ये चारीचामाळ पाड्यात पाणीपुरवठा योजना राबवली होती. पाड्यातील ५२ कुटुंबांसाठी पाच हजार लिटर क्षमतेची टाकी बसवून त्या ठिकाणी चार नळ बसवण्यात आले होते. मात्र टाकीला मुख्य पाइपलाइन न जोडल्याने ती योजना गेल्या वर्षभरापासून रखडली आहे. असे असताना ग्रामपंचायतीने ठेकेदाराला अर्धवट कामाचे तीन लाख पाच हजार रुपये दिले. लाखो रुपये खर्चुनही योजनेचा कोणताच लाभ न मिळाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

चौकशीची मागणी

ग्रामपंचायत व ठेकेदार यांच्यात मिलीभगत करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थ अविनाश डावरे यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘मतचोरी’ करून सत्तेत आलेल्या सरकारची ही ‘जमीनचोरी’, पार्थ पवार प्रकरणावर मोदी गप्प का? – राहुल गांधी ‘मतचोरी’ करून सत्तेत आलेल्या सरकारची ही ‘जमीनचोरी’, पार्थ पवार प्रकरणावर मोदी गप्प का? – राहुल गांधी
पार्थ पवार यांच्या पुण्यातील महाभूखंड घोटाळ्यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा...
अवकाळी पावसामुळे भात पिकाचे नुकसान, कृषी विभागाने लवकर पंचनामे पूर्ण करावे; शिवसेनेची मागणी
मतदान केंद्राबाहेर शिवसेना बोगस मतदारांच्या नावाचे बॅनर लावणार; बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी शिवसेनेची मोहिम
हिवाळ्यात ही फळे खा आणि निरोगी राहा
भाजी विक्रेत्यानं मित्राकडून हजार रुपये उसने घेतले अन् 11 कोटी जिंकले; आता मित्राच्या मुलींच्या लग्नासाठी देणार 50-50 लाख
दिव्यातील 7 इमारती मधून बेघर झालेल्या नागरिकांचा पालिकेला घेराव
दररोज एक टोमॅटो खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे