संकल्प विजयाचा… मुंबई जिंकण्याचा! शिवसेनेचा सोमवारी निर्धार मेळावा; उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन, विभागप्रमुख ते उपशाखाप्रमुखांची उपस्थिती

संकल्प विजयाचा… मुंबई जिंकण्याचा! शिवसेनेचा सोमवारी निर्धार मेळावा; उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन, विभागप्रमुख ते उपशाखाप्रमुखांची उपस्थिती

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबईवर पुन्हा भगवा फडकवायचा असा संकल्प शिवसेनेने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा निर्धार मेळावा येत्या सोमवारी वरळी येथे होणार आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

सोमवार, 27 ऑक्टोबर रोजी वरळी येथील एनएससीआय डोम येथे सायंकाळी 5 वाजता हा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला  विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि उपशाखाप्रमुखांपर्यंतचे सर्व पुरुष आणि महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी काय तयारी करायची, मतदार याद्यांबाबत कोणती खबरदारी घ्यायची, मतदारांमध्ये कशा प्रकारे जागृती करायची याबाबत उद्धव ठाकरे यावेळी महत्त्वपूर्ण सूचना व मार्गदर्शन करणार असल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळवण्यात आले आहे.

आदित्य ठाकरे फोडणार बोगस वोटिंगबॉम्ब

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे या मेळाव्यामध्ये मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात मोठा बॉम्ब फोडणार आहेत. मुंबईच्या मतदार यादीमध्ये असलेला घोटाळा सादरीकरणाच्या माध्यमातून उलगडून सांगणार आहेत.

n मतदार यादीतच दोष असतील तर निवडणुकीला अर्थ राहत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत याबद्दल पुराव्यानिशी सांगितले. महाराष्ट्रात शिवसेनेने आवाज उठवला आहे. मतदार यादीमधील घोळाबाबत आयोगाकडे शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांनी तक्रारी व पाठपुरावा करूनही काहीच कारवाई झालेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात बरेचसे बाहेरचे मतदार घुसवण्यात आल्याचे शिवसेनेने निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवूनही काहीच पावले उचलली गेली नाहीत.

n बिहारच्या निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या मतदार यादीची छाननी केल्यानंतर 7 कोटी 90 लाख मतदारांची ती यादी स्वच्छ करून 7 कोटी 24 लाखापर्यंत आली आहे. म्हणजेच सुमारे 48 लाख बोगस मतदार त्यातून वगळले गेले. मुंबईतही शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मतदार याद्यांची स्वतंत्रपणे छाननी केली. त्यात प्रचंड घोळ दिसला असून तो कशा पद्धतीचा आहे आणि आगामी महापालिका निवडणुकीत त्याआधारे बोगस मतदान होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याबद्दल आदित्य ठाकरे या निर्धार मेळाव्यात सादरीकरण करणार आहेत.

स्थळ एनएससीआय डोम, वरळी

वेळ  सायं. 5 वाजता

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;