साताऱ्यात 233 नगरसेवकपदांसाठी रस्सीखेच, 32 जागा वाढल्या; 117 ठिकाणी ‘महिलाराज’

साताऱ्यात 233 नगरसेवकपदांसाठी रस्सीखेच, 32 जागा वाढल्या; 117 ठिकाणी ‘महिलाराज’

राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका व नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर केल्याने जिह्याचे राजकारण ढवळून निघाले. सातारा, फलटण, कराड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड व मलकापूर या नगरपालिका व मेढा नगरपंचायतीत धुमशान सुरू झाले आहे. 9 नगरपालिकांमध्ये 115 प्रभागांत 233 नगरसेवकपदांसाठी रस्सीखेच निर्माण झाली आहे. 32 नगरसेवकपदे वाढल्याने नव्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. या निवडणुकीत 117 जागांवर ‘महिलाराज’ अवतरणार आहे.

सातारा जिह्यात सातारा, फलटण, कराड, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपूर, म्हसवड व मलकापूर या नऊ नगरपालिकांसह मेढा नगरपंचायतीची मुदत संपली आहे. त्यामुळे त्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.

जनगणना न झाल्याने मागील दहा वर्षांत वाढलेल्या संख्येचे प्रमाण लक्षात घेऊन सरकारने ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ वर्ग नगरपालिकांची सदस्य संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिह्यात 24 नगरसेवक वाढले आहेत. त्यामध्ये सातारा शहराची पूर्वीची नगरसेवकसंख्या 40 होती. हद्दवाढ झाल्यामुळे 8 नगरसेवकपदे वाढली. सातारा ही जिह्यातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका आहे.

‘अ’ वर्ग नगरपालिका क्षेत्रात 1 लाख 38 हजार लोकसंख्येच्या पुढील 8 हजार लोकसंख्येमागे 1 नगरसेवकपद यानुसार साताऱ्यात 2 नगरसेवकपदे वाढली आहेत. फलटण नगरपालिकेची पूर्वीची नगरसेवकसंख्या 25 होती, ती आता 27 होणार असून, या पालिकेत 2 नगरसेवक वाढणार आहेत. कराड नगरपालिकेची पूर्वीची नगरसेवकसंख्या 29 होती, ती आता 31 इतकी होणार आहे. या दोन्हीही ‘ब’ वर्ग नगरपालिका असून, या नगरपालिकांच्या क्षेत्रात 40 हजार लोकसंख्येच्यापुढे प्रत्येक 5 हजार लोकसंख्येमागे 1 नगरसेवकपद वाढले आहे. ‘क’ वर्ग नगरपालिका असलेल्या वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर आणि म्हसवड या नगरपालिकांमध्ये 25 हजार लोकसंख्येसाठी 17 नगरसेवकपदे, तर मलकापूर नगरपालिकेत 19 नगरसेवक होते.

या नगरपालिका क्षेत्रात प्रत्येक 5 हजार लोकसंख्येमागे 1 नगरसेवकपद यानुसार मलकापूरमध्ये 3 नगरसेवकपदे वाढली असून, या नगरपालिकेची नगरसेवकसंख्या 22 झाली आहे. वाई, महाबळेश्वर, पाचगणी आणि म्हसवड या नगरपालिकेत प्रत्येकी 3 पदे वाढल्याने त्यांची नगरसेवक संख्या प्रत्येकी 20 इतकी होणार आहे.

प्रचारासाठी फक्त 12 दिवस

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारांना प्रचारासाठी फक्त 12 दिवस मिळणार आहेत. त्यामुळे इच्छुकांना प्रचाराचा वेग वाढवावा लागणार आहे. इच्छूक आता सकाळपासून रात्रीपर्यंत प्रभागात धावाधाव करत आहेत. घराघरांत भेटीगाठींना वेग आला असून, सोशल मीडियावर मोहीम सुरू झाली आहे. प्रभागात लहान मेळावे घेणे हेच प्रचाराचे मुख्य साधन ठरणार आहे. मर्यादित वेळ असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्ते रात्रंदिवस कामाला लागले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिंदुस्थानी वंशाच्या तरुणांनी झुकरबर्ग यांचा विक्रम मोडला, अवघ्या 22 व्या वर्षी जगातील सर्वात तरुण अब्जाधीश हिंदुस्थानी वंशाच्या तरुणांनी झुकरबर्ग यांचा विक्रम मोडला, अवघ्या 22 व्या वर्षी जगातील सर्वात तरुण अब्जाधीश
जगातील सर्वात तरुण अब्जाधीश बनण्याचा मान फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना वयाच्या 23 व्या वर्षी मिळाला होता. त्यांचा हा विक्रम...
ठाणे महापालिकेचे 3 हजार 900 कोटी कुठे खर्च झाले? चौकशी करा, मुख्यमंत्र्यांना भाजपचे पत्र
शिंदे गटाची कोंडी करण्याचा भाजपचा डाव, गणेश नाईक ठाण्याचे निवडणूक प्रभारी
थंडीत करुन बघा असे मस्त दाटसर टेस्टी टोमॅटो सूप
मोदींनी आमंत्रण दिलंय; पुढील वर्षी हिंदुस्थानला येण्याचा विचार, डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान, IND-PAK युद्ध थांबवल्याचा पुनरुच्चार
केसांच्या उत्तम वाढीसाठी घरच्या घरी बनवा हा ज्यूस, केस होतील घनदाट
हिवाळ्यात चहामध्ये आलं का घालायला हवं, जाणून घ्या