रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संतापाचा उद्रेक! मुंब्रा प्रकरणातील ’पक्षपाती’ गुह्याच्या निषेधार्थ प्रचंड आंदोलन, सीएसएमटीमध्ये मोटरमनच्या ’लॉबी’समोर तासभर ठिय्या

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संतापाचा उद्रेक! मुंब्रा प्रकरणातील ’पक्षपाती’ गुह्याच्या निषेधार्थ प्रचंड आंदोलन, सीएसएमटीमध्ये मोटरमनच्या ’लॉबी’समोर तासभर ठिय्या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी ऐन गर्दीच्यावेळी पुकारलेल्या आंदोलनामुळे डाऊन दिशेने जाणाऱ्या सर्वच लोकल लटकल्या. त्यामुळे मेन लाईनवर लोकल गाडय़ांच्या रांगा लागल्या. सवा तास एकही लोकल धावली नाही. त्यामुळे प्रचंड गर्दी झाली आणि गोंधळ उडाला. त्यात मशिद स्थानकापुढील थांबलेल्या गाडय़ांमधील प्रवाशांना वाहतूक ठप्प होण्याचे कारण कळले नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांनी रुळावरुन चालत जाण्यास सुरुवात केली. याचदरम्यान आंदोलन थांबल्यानंतर सीएसएमटी स्थानकातून सुटलेल्या पहिल्या अंबरनाथ जलद लोकलने सॅण्डहर्स्ट स्थानकाजवळ रूळावरुन चाललेल्या पाच प्रवाशांना उडवले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले.

ऐन गर्दीच्यावेळी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने सीएसएमटी स्थानकात ठिय्या देत आंदोलन पुकारले. परिणामी अप आणि डाऊन मार्गावरील सर्व लोकल खोळंबून पडल्या. त्यामुळे सर्वच स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली. याचदरम्यान सॅण्डहर्स्ट रोड स्थानकापासून 50 मीटर अंतरावर अप धिमी लोकल उभी होती. ती लोकल जागेवरून हलतच नसल्याने तसेच स्थानक जवळच असल्याने काही प्रवाशांनी उभ्या असलेल्या लोकलमधून ट्रॅकवर उडय़ा टाकल्या आणि ते चालत स्थानकाच्या दिशेने निघाले. तेवढय़ात डाऊन मार्गावरील अंबरनाथ जलद लोकल आलेली त्या प्रवाशांना कळले नाही. त्यापैकी पाच जणांना जलद लोकलची धडक बसली. यात सगळे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ जे जे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य तीन प्रवासी जखमी आहेत. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास करण्यात येईल, घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही तपासले जातील, असे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात येते.

आंदोलन कशासाठी?

9 जून रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ धावत्या लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. त्या घटनेप्रकरणी ‘व्हीजेटीआय’ने केलेल्या चौकशी अहवालाच्या आधारे रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी) मध्य रेल्वेच्या दोघा अभियंत्यांसह इतर कर्मचारी-अधिकाऩयांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्याविरोधात मागील काही दिवसांपासून रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष खदखदत होता. त्याचा उद्रेक गुरुवारी सायंकाळी झाला.

जीआरपी, आरपीएफची ज्यादा कुमक मागवली

आंदोलनाने उग्र रुप धारण करताच स्थानक परिसरात जीआरपी आणि आरपीएफचा बंदोबस्त वाढवण्यात आला. सीएसएमटी स्थानकातील पोलिस ठाण्यांबरोबरच परिसरातील पोलिस ठाण्यांतून जादा कुमक मागवण्यात आली. याचदरम्यान स्थानक परिसरात ‘जॅमर’ लावून मोबाईल नेटवर्कवर प्रतिबंध लादण्यात आला.

जीआरपीवरच गुन्हा दाखल करा

व्हीजेटीआयच्या चौकशी अहवालाचेच मूल्यांकन केले पाहिजे. त्या आधारे रेल्वे कर्मचाऱ्यांवर दाखल केलेला गुन्हा अन्यायकारक आणि पूर्णपणे चुकीचा आहे. तो गुन्हा तात्काळ दाखल करण्याची आमची प्रमुख मागणी आहे. जून महिन्यात मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातातील 5 प्रवाशांच्या मृत्यूप्रकरणी जीआरपीवरच गुन्हा दाखल केला पाहिजे. लोकल ट्रेनमधील गर्दीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी रेल्वेची आहे. ती जबाबदारी पार पाडण्यात जीआरपी सपशेल अपयशी ठरली, अशी प्रतिक्रिया सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे विभागीय सचिव संजीवकुमार दुबे यांनी दिली.

नेमके काय घडले?

सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरु केलेले आंदोलन 6 वाजून 46 मिनिटांपर्यंत सुरु ठेवण्यात आले. या सवातासाच्या कालावधीत मोटरमन आणि गार्ड आपल्या लॉबीमधून बाहेर पडू शकले नाहीत. ते लॉबीमध्येच अडकले. परिणामी, प्रचंड वर्दळीच्या सीएसएमटी स्थानकातील हार्बरच्या दोन प्लॅटफॉर्मवरील आणि मेन लाईनच्या चार प्लॅटफॉर्मवरील सर्व लोकलची वाहतूक ठप्प झाली. हे आंदोलन थांबवण्यासाठी अखेर मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी मध्यस्थी केली. त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांवरील कारवाई थांबवण्यासंदर्भात योग्य ती पावले उचलली जातील, असे आश्वासन आंदोलक रेल्वे संघटनेच्या नेत्यांना दिले. तसेच प्रवाशांना वेठीस न धरण्याचे आवाहन केले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन थांबवले.

नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी!

आंदोलनामध्ये सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे इंजिनिअरींग, सिग्नल आणि टेलिकॉम, मोटरमन, स्टेशन मास्तर, चेकिंग स्टाफ, ओएचई, कमर्शिअल अशा सर्वच विभागांतील 500 हून अधिक कर्मचारी सहभागी झाले. त्यांनी सीएसएमटी स्थानक परिसरात जोरजोरात घोषणाबाजी केली. ‘नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी’, ‘एफआयआर वापस लो’, ‘ईमानदारों पर वार, नही सहेंगे अत्याचार’ अशा घोषणा देत तसेच हातामध्ये झेंडे आणि निषेध फलक फलकावत कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्थानक परिसर दणाणून सोडला. आंदोलनामुळे स्थानक परिसरात मोठय़ा प्रमाणावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाविरोधात रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक

सीएसएमटी स्थानकात सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या पुढाकाराने पुकारलेल्या आंदोलनानंतर मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या आंदोलक संघटनेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे. यासंदर्भात रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे ट्विटद्वारे मागणी केली. रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन झाले नसते, तर प्रवाशांचा हकनाक बळी गेला नसता, अशी प्रतिक्रिया उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी दिली. =प्रवाशांचे हाल करुन केलेले आंदोलन पूर्णपणे चुकीचे आहे, असे महाराष्ट्र महिला प्रवासी संघटनेच्या वंदना सोनवणे यांनी दिली. उपनगरीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य मनोहर शेलार यांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रवाशांना वारंवार सांगतो, ट्रॅकवरून चालू नका! 

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला म्हणाले. आम्ही प्रवाशांना वारंवार सांगतो की रेल्वे ट्रॅकवरुन चालू नका, त्यामुळे इजा पोहोचू शकते. ट्रॅकवरून गाडी जाते, त्यावेळेस गाडीचा वेग खूप असतो. अशा स्थितीत गाडी थांबवणे शक्य नसते. याचदरम्यान त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर भाष्य केले. अयोग्य अहवालाच्या आधारावर मध्य रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर ठाणे रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याचा निषेध करण्यासाठी सीएसएमटी येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे आंदोलकांना सूचित करण्यात आले. ‘व्हीजेटीआय’द्वारे केलेल्या चौकशीचा अहवाल सार्वजनिक केलेला नाही. त्यात जे तथ्य मांडले, ते अयोग्य आहे. रेल्वे रूळाला तडा गेला, असे त्यात म्हटले आहे. परंतु, ते पूर्णपणे चुकीचे आहे.

मृतांची नावे हेली मोहमाया (19), सूर्यकांत नाईक (मीरा रोड)

जखमी याफिझा चोगले, पैफ चोगले, खुशबू मोहमाया

प्रवाशांच्या मृत्यूला आंदोलक जबाबदार

आंदोलकांनी ऐन गर्दीच्या वेळेस आंदोलन केल्यामुळेच ही दुर्घटना घडली. आंदोलन झाले नसते तर लोकल खोळंबून पडल्या नसत्या. प्रवाशांना कामावर जायची किंवा इच्छित स्थळी वेळेवर पोहचण्यास विलंब झाला. परिणामी प्रवासी ट्रॅकवर उतरून पायी निघाले असावे. त्यातच हा अपघात झाला, असा संताप प्रवाशांमधून व्यक्त होत आहेत.

25 हून अधिक लोकल रद्द

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सीएसएमएटीहून सायंकाळी सवा तासात एकही लोकल सुटली नाही. जवळपास 25 हून अधिक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

बेस्ट, मेट्रो पकडण्यासाठी प्रवाशांची एकच धावाधाव

लोकल वाहतूक ठप्प झाल्याचे पाहून प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. अनेक प्रवाशांनी बेस्ट बसेस, भुयारी मेट्रो, पश्चिम रेल्वेच्या लोकल पकडण्यासाठी धाव घेतली. त्याचबरोबर मुलुंडपुढील स्थानकांवर जाणाऱ्या प्रवाशांनी टॅक्सी आणि ओला-उबरचा पर्याय निवडला. रखडलेल्या लाखो प्रवाशांची घरी जाण्यासाठी रात्री उशिरापर्यंच एकच धावाधाव सुरू होती.

कामगारांची निदर्शने

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. त्या मोर्चात दोन हजारांहून अधिक रेल्वे कर्मचारी सहभागी झाले होते. त्यापैकी 500 कर्मचाऱ्यांनी सीएसएमटीतील मोटरमन-गार्डच्या लॉबीसमोर ठिय्या मांडला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिंदुस्थानी वंशाच्या तरुणांनी झुकरबर्ग यांचा विक्रम मोडला, अवघ्या 22 व्या वर्षी जगातील सर्वात तरुण अब्जाधीश हिंदुस्थानी वंशाच्या तरुणांनी झुकरबर्ग यांचा विक्रम मोडला, अवघ्या 22 व्या वर्षी जगातील सर्वात तरुण अब्जाधीश
जगातील सर्वात तरुण अब्जाधीश बनण्याचा मान फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना वयाच्या 23 व्या वर्षी मिळाला होता. त्यांचा हा विक्रम...
ठाणे महापालिकेचे 3 हजार 900 कोटी कुठे खर्च झाले? चौकशी करा, मुख्यमंत्र्यांना भाजपचे पत्र
शिंदे गटाची कोंडी करण्याचा भाजपचा डाव, गणेश नाईक ठाण्याचे निवडणूक प्रभारी
थंडीत करुन बघा असे मस्त दाटसर टेस्टी टोमॅटो सूप
मोदींनी आमंत्रण दिलंय; पुढील वर्षी हिंदुस्थानला येण्याचा विचार, डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान, IND-PAK युद्ध थांबवल्याचा पुनरुच्चार
केसांच्या उत्तम वाढीसाठी घरच्या घरी बनवा हा ज्यूस, केस होतील घनदाट
हिवाळ्यात चहामध्ये आलं का घालायला हवं, जाणून घ्या