दिव्यातील 7 इमारती मधून बेघर झालेल्या नागरिकांचा पालिकेला घेराव

दिव्यातील 7 इमारती मधून बेघर झालेल्या नागरिकांचा पालिकेला घेराव

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिव्यातील सात बेकायदा इमारती पालिका प्रशासनाने रिकाम्या केल्या आहेत. जवळपास २७५ कुटुंबे आणि १ हजार ६०० रहिवासी रस्त्यावर आले आहेत. दरम्यान एकीकडे शेकडो कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले असताना मात्र भूमाफिया, बिल्डर मोकाट कसे, असा सवाल उपस्थित झाला आहे.

दिव्यातील बेकायदा बांधकाम इमारती तोडल्यामुळे २७५ कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. दिव्यातील ७ इमारती मधून बेघर झालेल्या नागरिकांचा पालिकेला घेराव घातला असून, या रहिवाश्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येणार असल्याचा इशारा पालिकेला दिला आहे. यावेळी बिल्डरवर गुन्हा दाखल करा, आम्हाला घरे द्या किंवा आताच्या बाजारभावाप्रमाणे आम्हाला पैसे द्या अशी संतप्ल मागणी संतप्त रहिवाशांनी केली आहे.

दिवाळीच्या सुट्टीनंतर ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा अनधिकृत इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला असून सोमवारी दिव्यात कारवाई करायला गेलेल्या पालिकेच्या पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कारवाईला विरोध करत असलेल्या एका महिलेने तर पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले होते. त्यामुळे कारवाईच्या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता. एकूण ७ इमारतींवर पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आलेली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दोन दिवसांत या दोन सेलिब्रिटींचा कार्डियाक अरेस्टने मृत्यू; कार्डियाक अरेस्ट हार्ट अटॅकपेक्षा धोकादायक असतो? दोन दिवसांत या दोन सेलिब्रिटींचा कार्डियाक अरेस्टने मृत्यू; कार्डियाक अरेस्ट हार्ट अटॅकपेक्षा धोकादायक असतो?
हिंदी चित्रपटसृष्टीने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक दिग्गज सेलिब्रिटींना गमावलं आहे. दरम्याव या दोन दिवसात आणखी दोन सेलिब्रिटीचे निधन झाले आहे....
पार्थ पवारवर कारवाई करावी आणि अजितदादांनी राजीनामा द्यावा, पुण्यातील जमीन घोटाळाप्रकरणी अंबादास दानवे यांची मागणी
अखेर पुण्यातल्या त्या जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवार यांची माहिती; पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याबाबत मौन
Photo – उद्धव ठाकरे यांचा बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद
आर.डी.सामंत कन्स्ट्रक्शन कंपनीचा ४४ कोटी रूपयांचा डांबर घोटाळा, बाळ माने यांचा खळबळजनक आरोप
मुंबईतली मेट्रो 2A चे भाडं वाढवण्याची शक्यता, केंद्राकडे प्रस्ताव
Mumbai News – दिल्लीनंतर मुंबई विमानतळावर तांत्रिक बिघाड, विमान सेवा विस्कळीत