गट, गण आरक्षणाची अधिसूचना जाहीर
अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या 75 गट व 14 पंचायत समितींच्या 150 गणांच्या अंतिम आरक्षणाची अधिसूचना (गॅझेट) सोमवारी नाशिक विभागीय आयुक्तांनी जाहीर केली. त्यामुळे 13 ऑक्टोबर सोडतीद्वारे निश्चित करण्यात आलेले गट व गणांचे आरक्षण अंतिम करण्यात आले असून, आता निवडणुकीची प्रतीक्षा इच्छुकांना लागली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद गट व गणांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील अंतिम मतदार याद्या अधिनियमाच्या कलम 13 खाली अधिप्रमाणित (प्रसिद्ध) करण्यात आल्या आहेत. त्यानंतर या मतदार याद्या मतदान केंद्रनिहाय 12 नाव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
मागील महिन्यात 13 ऑक्टोबरला जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले होते. त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार अवघ्या 10 हरकती व सूचना आल्या. यात गटांवर 6, तर गणांवर चार हरकती यांचा समावेश होता. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सुनावणी घेऊन त्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्तांकडे निश्चित करण्यात आलेले आरक्षण पाठविले होते. त्यावर अंतिम सुनावणी झाल्यानंतर सोमवारी (दि. 3) अंतिम आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अहिल्यानगरात 35 ठिकाणी येणार ‘महिलाराज’
n अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या 75 गटांमध्ये 9 अनुसूचित जाती त्यापैकी 6 महिला, 7 अनुसूचित जमाती त्यापैकी 4 महिला, नागरिकांचा मागसप्रवर्ग 20 जागांपैकी 10 महिलांसाठी, सर्वसाधारण 39 जागांपैकी 19 महिलांसाठी राखीव असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. गट व गणांचे आरक्षण निश्चित करून ते अंतिम करण्यात आल्याने आता सर्वांना निवडणुकीचे वेध लागले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List