ओटीपी पाठविला नसतानाही ऑनलाइन एफडीतून 73 हजार पळवले
मोबाईलवर ओटीपी पाठवून तो ओटीपी शेअर केला नसतानाही एका तरुणाच्या बँकेतील ऑनलाइन एफडीतून 73 हजार 900 रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणुकीचा हा प्रकार रात्री घडला आहे.
याप्रकरणी हरीश भिकाजी पितळे (वय 33, रा. वारणाली) यांनी संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. हरीश पितळे हे कुटुंबीयांसह शहरातील वारणाली येथील गंगानगर परिसरात राहतात. 25 आणि 26 फेब्रुवारी 2025 रोजी अज्ञात मोबाईलवरून त्यांना एक ओटीपी आला. त्याच्याकडे पितळे यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर, पितळे यांच्या इंडसइंड बँकेचे खाते मोबाईल ऍपवर बेनिफिशरीला जोडले जाऊन ऑनलाइन एफडीतील 73 हजार 900 रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेण्यात आले. याप्रकरणी हरीश पितळे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List