भाजी विक्रेत्यानं मित्राकडून हजार रुपये उसने घेतले अन् 11 कोटी जिंकले; आता मित्राच्या मुलींच्या लग्नासाठी देणार 50-50 लाख

भाजी विक्रेत्यानं मित्राकडून हजार रुपये उसने घेतले अन् 11 कोटी जिंकले; आता मित्राच्या मुलींच्या लग्नासाठी देणार 50-50 लाख

‘उपरवाला देता है तो छप्पर फाड के’, असे म्हणतात आणि याचाच प्रत्यय राजस्थानमधील कोटपुतळी येथील भाजी विक्रेत्याला आला आहे. मित्राकडून हजार रुपये उसने घेऊन लॉटरीचे तिकीट घेतलेल्या भाजी विक्रेत्याला तब्बल 11 कोटी रुपयांचे बक्षीस लागले. एका रात्रीत भाजी विक्रेता कोट्याधीश झाला. अर्थात मित्राचे उपकार तो विसरला नाही आणि मित्राच्या मुलींसाठीही आपल्याला मिळणाऱ्या पैशातील एक हिस्सा देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अमित सेहरा हा जयपूरमधील कोटपुतळी येथील रहिवासी असून तो भाजी विकतो. अमित मित्र मुकेशसोबत नुकताच पंजाबला गेला होता. दोघे एका हॉटेलमध्ये चहासाठी थांबलेले असतानाच मुकेशने अमितला रतन लॉटरी एजन्सीबाबत सांगितले.

अमितकडे तिकीट घेण्यासाठी पैसे नसल्याने त्याने मुकेशकडून हजार रुपये उसने घेतले. या हजार रुपयात त्याने लॉटरीचे दोन तिकीट खरेदी केले. यापैकी एका तिकीटाला लॉटरी लागली असून त्याने 11 कोटी रुपये जिंकले आहे. अर्थात कोट्याधीश झाल्यानंतरही अमित मित्राला विसरला नाही आणि त्याने आपल्याला केलेल्या मदतीची परतफेड करण्याचे ठरवले. त्याने मुकेशच्या मुलींच्या लग्नासाठी प्रत्येकी 50-50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

अमितने बठिंडा येथे लॉटरीचे दोन तिकीट घेतले होते. यापैकी एकाला जॅकपॉट लागला. दुसऱ्या तिकिटानेही हजार रुपये जिंकले, अशी माहिती त्याने एएनआयशी बोलताना सांगितले. अनपेक्षित धनलाभ झाल्याने 32 वर्षीय अमित रातोरात कोट्याधीश झाला. लॉटरी विकणाऱ्या व्यक्तीने अमितला कॉल करून ही गुड न्यूज दिली. औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अमित कुटुंबासोबत बठिंडा येथे गेला. यावेळी त्याने आपल्या भावनाही व्यक्त केल्या.

अमितने मी हनुमानाचा भक्त असल्याचे सांगितले. माझे सगळे दु:ख आज संपले असून मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही. पंजाब सरकार आणि लॉटरी एजन्सीचे आभार, असे म्हणत अमितने लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे देणाऱ्या मित्राच्या दोन्ही मुलींच्या लग्नासाठी 50-50 लाख रुपये देण्याची घोषणा केली. बाकीचे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी आणि घर बांधण्यासाठी वापरणार असल्याचेही अमितने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दोन दिवसांत या दोन सेलिब्रिटींचा कार्डियाक अरेस्टने मृत्यू; कार्डियाक अरेस्ट हार्ट अटॅकपेक्षा धोकादायक असतो? दोन दिवसांत या दोन सेलिब्रिटींचा कार्डियाक अरेस्टने मृत्यू; कार्डियाक अरेस्ट हार्ट अटॅकपेक्षा धोकादायक असतो?
हिंदी चित्रपटसृष्टीने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक दिग्गज सेलिब्रिटींना गमावलं आहे. दरम्याव या दोन दिवसात आणखी दोन सेलिब्रिटीचे निधन झाले आहे....
पार्थ पवारवर कारवाई करावी आणि अजितदादांनी राजीनामा द्यावा, पुण्यातील जमीन घोटाळाप्रकरणी अंबादास दानवे यांची मागणी
अखेर पुण्यातल्या त्या जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवार यांची माहिती; पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याबाबत मौन
Photo – उद्धव ठाकरे यांचा बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद
आर.डी.सामंत कन्स्ट्रक्शन कंपनीचा ४४ कोटी रूपयांचा डांबर घोटाळा, बाळ माने यांचा खळबळजनक आरोप
मुंबईतली मेट्रो 2A चे भाडं वाढवण्याची शक्यता, केंद्राकडे प्रस्ताव
Mumbai News – दिल्लीनंतर मुंबई विमानतळावर तांत्रिक बिघाड, विमान सेवा विस्कळीत