Rashmika Wedding- सनई चौघडे वाजणार! या दिवशी होणार रश्मिकाचं डेस्टिनेशन वेडिंग, वाचा
बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. गेल्याच महिन्यात या दोघांनी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर साखरपुडा केल्याची चर्चा होती. अशातच आता रश्मिका आणि विजय लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे समोर येत आहे.
फेब्रुवारीमध्ये शुभविवाहाचा मुहुर्त
पिंकव्हिलाने दिलेच्या वृत्तानुसार, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना पुढच्या वर्षी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी लग्न करणार आहेत. त्यांचा भव्य विवाहसोहळा राजस्थानातील उदयपूर येथील एका राजवाड्यात पार पडणार असल्याची माहिती आहे. या जोडप्याने ३ ऑक्टोबर २०२५ रोजी हैदराबादमध्ये आपल्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा केला होता. मात्र अद्यापही या दोन्ही कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याची बातमी येताच नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आता त्यांच्या लग्नाची बातमी आल्यावर चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर आला आहे.
I’ll marry VIJAY
Says RashmikaDeverakonda#VijayDeverakonda #RashmikaMandanna pic.twitter.com/PXhHsQ0wfx— THE (@TheDEVERA_fan) November 5, 2025
रश्मिका आणि विजय यांची पहिली भेट 2018 मध्ये गीता गोविंदम या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. प्रेक्षकांना त्यांची केमिस्ट्री खूप आवडली. एका वर्षानंतर, ते डिअर कॉम्रेड या चित्रपटासाठी पुन्हा एकत्र आले. लवकरच चाहत्यांना त्यांची ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यातही पाहायला मिळेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.

Comment List